धुळे, दि. 10 :- औरंगाबाद जिल्हा
परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेले शासकीय प्रौढ
अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद या संस्थेत सन 2015-16 या चालू शैक्षणिक
वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. प्रवेश अर्ज
स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 असून गरजूंनी प्रत्यक्ष किंवा
पत्राद्वारे या संस्थेस संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन
औरंगाबाद शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज अर्जदारांनी
कार्यालयीन वेळेत अधीक्षक, शासकीयच प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. 13,
एन-12, हडको, टी.व्ही. सेंटर रोड, औरंगाबाद येथून विनामूल्य प्रवेश अर्ज प्राप्त
करून घ्यावे. अर्जासोबत अपंगत्वाचे
प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, पालकाचा उत्पन्नाचा दाखला,
इयत्ता 4 थी, इयत्ता नववी पासचे गुणपत्रक, तीन पासपोर्ट साईज फोटो जोडावेत.
या संस्थेत शिवणकला, आर्मेचर वायडींग (विद्युत),
हस्त जुळाई व छपाई, पुस्तक बांधणी तसेच सर्व प्रशिक्षणार्थीसाठी फिटर या
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.
शिवणकला व पुस्तक बांधणीसाठी चौथी उत्तीर्ण व हस्तजुळाई व छपाई तसेच आर्मेचर
वायडिंग (विद्युत) साठी उमेदवार नववी उत्तीर्ण असावा. या संस्थेत वय 16 ते 45 या वयोगटातील
अस्थिव्यंगानाच प्रवेश दिला जातो.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा