मंगळवार, २३ जून, २०१५

नवीन बाल कामगारांच्या विशेष प्रशिक्षण केंद्राचे प्रस्ताव निकषानुसार तपासा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 23 :- जिल्ह्यात बंद असलेली  बाल कामगार विशेष प्रशिक्षण केंद्र  नव्याने सुरू करण्यासाठी सेवाभावी स्वंयसेवी संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांची निकषानुसार तपासणी करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  दिले.
            राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात  आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे,  सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, सरकारी कामगार अधिकारी आर. टी. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल भामरे, शिक्षणाधिकारी (निरंतर) बी. जे. पाटील,  औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक  पंकज जाधव, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे मास्टर ट्रेनर व्ही. ए. देशमुख, फिल्ड ऑफिसर डी. यु. बडगुजर, श्रीमती एन. बी. काळोखे, श्रीमती जयश्री निकम  आदी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, सेवाभावी स्वयंसेवी संस्थांकडून 23 विशेष प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यापैकी जे अर्ज दिलेल्या निकषानुसार परिपूर्ण आहेत अशाच अर्जांची  प्रशिक्षण केंद्राच्या  ठिकाणी  संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन दिलेल्या यादीनुसार बाल कामगार आहेत किंवा नाही, तसेच ज्या जागेवर प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे ती जागा निकषानुसार आहे किंवा नाही,  याबाबतची तपासणी करावी, असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा