मुंबई दि. 21 :धर्मादाय संस्थामार्फत
चालविण्यात येणा-या हॉस्पिटलमधील आर्थिकदृष्टया गरीब वर्गातील लोकांसाठी असलेल्या अत्यावश्यक
वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक असून जे हॉस्पिटल अशी माहिती देणार नाहीत
तसेच हॉस्पिटलमधील रिकाम्या बेडची माहिती आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर टाकणार नाही
त्यांचेवर कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांच्या
दालनात धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली.
धर्मादाय संघटना अधिक प्रभावी व गतिमान होण्यासाठी तसेच सर्व धर्मादाय विश्वस्तांमध्ये
संस्थेच्या लेखा परिक्षण, बदल अर्ज व इतर
न्यायिक बाबी, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांच्या
बाबत उपाययोजना आदिंबाबत विश्वस्त संस्थामध्ये लिगल प्रोव्हिजन अवेरनेस येण्यासाठी
नाशिक येथील सपकाळ नॉलेज हब येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजित करण्याचे नियोजन आहे.
या कार्यशाळेचे निमंत्रणही यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी आयुक्त सावळे
यांच्यासोबत सपकाळ नॉलेज हब चे रविंद्र सपकाळ, नाशिक
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ नितिन ठाकरे, महाराष्ट्र साहित्य
परिषदेचे कार्याध्यक्ष उमेश गायधनी आदि उपस्थित होते. या कार्यशाळेस राज्यातील 3
हजार
विश्वस्तांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना
दिली.
राज्यभरातील
सर्व धर्मादाय कार्यालयात दि. 24 ऑगस्ट ते 5
सप्टेंबर
या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले असून मुंबई येथील कार्यालयात पाच हजार पाचशे
बदल अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. नवीन दाखल होणारे बदल अर्ज त्याचदिवशी निकाली काढण्यासाठी
विशेष एक खिडकी योजनेची तरतूद करण्यात आली असून आयुक्तालयात प्रलंबित असलेल्या अवादातीत
बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) अर्जांची समस्या निवारण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष
अभियानाची माहिती यावेळी दिली.
सध्या
राज्यात नोंदणीकृत साडेसात लाख धर्मादाय विश्वस्त संस्था असून त्यापैकी साडेतीन लाख
विश्वस्त संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी 80 हजार
संस्था मोठया स्वरुपाच्या असून या संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर या कार्यशाळेत विश्वस्त
संस्थांना अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात
येणार आहे.
---0000---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा