मुंबई,
दि. 21 : यावर्षी महसूल व वन विभागाकडून राज्यात टंचाई घोषित केलेल्या भागांमध्ये उघडण्यात
आलेल्या तसेच उघडण्यात येणाऱ्या जनावरांच्या छावण्यांमध्ये दाखल झालेल्या तसेच दाखल
होणाऱ्या जनावरांना रोग प्रतिबंधक लसीकरण, पशू रुग्णांवर उपचार, जंतनाशके पाजणे, लहान
व मोठ्या शस्त्रक्रिया, खच्चीकरण, कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, वंध्यत्व तपासणी इत्यादी
सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
यासंबंधीचा शासन निर्णय आज दि. 21 सप्टेंबर,
2015 रोजी जारी करण्यात आला असून तो ताबडतोब अंमलात आला आहे. वरील विविध पशुवैद्यकीय
सेवा टंचाई परिस्थिती संपुष्टात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात येईपर्यंतच्या कालावधीसाठी
विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा