मुंबई, दि. 21 : ऑक्टोबर-नोव्हेंबर-2011
मध्ये झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा (आयएएस/आयएफएस/आयपीएस इ.) निकाल मार्च-2012
च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांकरिता राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्था, हजारीमल
सोमाणी मार्ग,छत्रपती शिवाजी टर्मीनस समोर, मुंबई येथे दि. 10 व 11 मार्च 2012
रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रम
(मॉक इंटरव्ह्यू टेक्नीक प्रोग्रॅम ) आयोजित
करण्यात आला आहे.
ज्या
उत्तीर्ण उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी फोटो लावलेला
विहित नमुन्यातील अर्ज (6
प्रती) व सोबत नागरी सेवा परीक्षेच्या हॉल
तिकीटाची छायाप्रत 6 मार्च, 2012 पर्यंत (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
कार्यालयास सादर करावा. विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयात व
वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. तसेच मुंबई बाहेरील
विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार नाही असेही कळविण्यात आले आहे. असे संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. म. बा. भिडे यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा