मुंबई, दि.
21 : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत
आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आढावा घेतला.
आज मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस
आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव जयंतकुमार बाँठीया, सचिव
भूषण गगराणी, जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी व्यंकटेशन, आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जीवनदायी
योजनेचे प्रकल्प कार्यालय, जिल्हा कार्यालये, आरोग्य मित्रांना देण्यात येणारे ॲप्रन, रुग्णालयातील
योजनेच्या मदत केंद्रांची डिझाईन तसेच या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांचा आढावा
यावेळी घेण्यात आला.
या योजनेंतर्गत
26 फेब्रुवारीपासून आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत.
त्याविषयी तसेच सहभागी रुग्णालयांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात
आली. आरोग्यमंत्री श्री. शेट्टी यांनी आरोग्य कार्ड वाटपाचा आढावाही घेतला.
0
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा