मुंबई, दि. 21 : राज्य शासनाच्या आयुक्त,
अन्न व औषध प्रशासनाचे मुख्यालय, विभागीय
व जिल्हा कार्यालये तसेच औषध नियंत्रण प्रयोगशाळेत कार्यरत असणाऱ्या अंध,
क्षीणदृष्टी, मुकबधिर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहायक तंत्रज्ञान / उपकरणे
उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
संबंधित अपंग कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी त्यांच्या कार्यालय
प्रमुखांमार्फत सात दिवसाच्या आत आयुक्त, अन्न व औषध प्रशासन या कार्यालयाकडे सादर
करावी, असे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा