मुंबई, दि. 21 : राज्यातील खासगी विनाअनुदानित महाविद्यालयात
सन 2011-12 या वर्षी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी
प्रथम वर्षास (वैद्यकीय,
दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी,
युनानी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार
व नर्सिंग) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी
आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची अंशत: प्रतिपूर्ती करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने 19 जानेवारी 2012 रोजी घेतला आहे.
शिक्षण
शुल्क समितीने प्रमाणित केलेल्या शैक्षणिक शुल्काच्या 50
टक्के रक्कम प्रतिपूर्तीपोटी देण्यात येईल. पात्र
विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख अथवा
त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. कुटुंबातील दोन अपत्यांसाठीच ही योजना लागू आहे. ही योजना अभिमत विद्यापीठात
प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू रहाणार नाही.
विनाअनुदानित
खासगी महाविद्यालयात एकूण प्रवेश क्षमतेच्या 15 टक्के जागा अनिवासी भारतीयांसाठी राखीव असून या कोटयात प्रवेशित झालेल्या
उमेदवारांना या शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय असणार नाही.
एखादा
विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या एखाद्या वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्या
वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण होईपर्यंतच्या कालावधीत सदर शिष्यवृत्ती अनुज्ञेय
राहणार नाही.
आर्थिक
मागास प्रवर्गाचे उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र हे संबंधित तहसिलदार यांचे असणे
आवश्यक आहे.
जे
विद्यार्थी महाराष्ट्राचे अधिवासी असतील म्हणजे आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या
प्रथम वर्षास ज्या सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे त्यांना प्रवेश मिळाला,त्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या दिनांकारोजी ज्या विद्यार्थ्यांचे
महाराष्ट्रातील वास्तव्य किमान 15 किंवा त्यापेक्षा जास्त
वर्षांचे आहे, असेच विद्यार्थी ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी
पात्र राहतील.
हा
शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा
संगणक संकेतांक 2012011909305605001 असा आहे.
0
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा