नाशिक, दि. 25 :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीरीत्या राबविण्यामध्ये पुरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तपत्राच्या पत्रकारांना जिल्हास्तरावर तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पत्रकारांना जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार रुपये 25 हजार, द्वितीय पुरस्कार 15 हजार आणि तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये आहे. यासाठी पत्रकारांनी आपले प्रस्ताव तीन प्रतीत 30 जून 2015 पर्यंत सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सारडा संकुल, तिसरा मजला, एम.जी.रोड, नाशिक या पत्त्यावर पाठवावे.
या प्रस्तावामध्ये उमेदवारांनी आपले पुर्ण नाव, पत्ता, जन्म तारीख, शिक्षण, पत्रकारितेतील अनुभव, विकास विषयक पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा तपशिल, आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रचार प्रभावी व यशस्वी राबविण्यामध्ये पुरक व प्रबोधनात्मक बातम्याच्या माध्यमातुन 2 मे 2014 ते 1 मे 2015 या कालावधीत दिलेल्या वस्तुनिष्ठ प्रसिद्धी साहित्याचा तपशील आदिंचा समावेश असणे आवश्यक आहे. तरी पत्रकार बांधवांनी आपले प्रस्ताव तीन प्रतीत 30 जून
2015 पर्यत जिल्हा माहिती कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नाशिक यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा