मुंबई दि.25 : - शिक्षण हक्क कायद्यातील (RTE) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी इयत्ता 5 वी मध्ये
व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7 वी ऐवजी इयत्ता 8 वी मध्ये घेण्याचा निर्णय
शालेय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी आज घेतला आहे.
आरटीई नुसार आता प्राथमिक इ. 1ली ते 5 वी, उच्च प्राथमिक इ.6 वी ते 8 वी आणि माध्यमिक इयत्ता 9 वी ते 10 वी असे तीन
विभाग करण्यात आले आहेत. त्यानुसार शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी मध्ये
होणे अपेक्षित आहे. शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये जर ही परीक्षा घेतली तर या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी
इ.4 थी आणि इ. 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वीच दिली आहे.त्यामुळे त्यांना
पुन्हा यंदा परीक्षा द्यावी लागेल, म्हणून शैक्षणिक
वर्ष 2016-17 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य
होईल, असे श्री.तावडे यांनी सांगितले.
यापुढे पूर्व
माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक
शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच या परीक्षा पध्दतीत व अभ्यासक्रमात काही बदल
होणे गरजेचे आहे, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी एक शिक्षण समिती नेमण्यात येईल. त्यांच्या
सूचनांनुसार परीक्षाविषयक मार्गदर्शन डिसेंबर 2015 पर्यंत करण्यात येईल, असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा