धुळे, िद. 26 :- भारत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश
आहे. सृमृध्द देश निर्माण करावयाचा असेल
तर युवकांनी पुढे येऊन सामाजिक समतेचा संदेश समाजात रूजवावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
26 जून हा दिवस राजर्षि छत्रपती
शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक
न्याय विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समता दिंडी व संदेश यात्रेचे
आयोजन केले होते. या समता दिंडीचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम
हुळवले यांनी दीप प्रज्ज्वलन व हिरवी
झेंडी दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी माजी आमदार धरमचंद चोरडिया, जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील, उपविभागीय अधिकारी
विठ्ठल सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, समाज कल्याण विभागाच्या
सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली
हिंगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व्ही. ए. पाटील, विभागीय जात पडताळणी समिती क्र. 2 उपायुक्त पी. बी. नाईक, संशोधन
अधिकारी राकेश पाटील, विशेष अधिकारी समाज कल्याण श्रीमती हर्षदा बडगुजर, विलास करडक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, भारतात विविध जाती धर्माचे लोक
आहेत. त्यांच्यात
समानतेचा बंधुभाव
रहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
भारत हा जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश आहे. त्यात 65 टक्के तरूण आहेत, असेही त्यांनी
सांगितले.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व
काळात समतेचा संदेश आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुध्दा
स्वातंत्र्यपूर्व काळात समता प्रस्थापित करण्यासाठी मौलिक कार्य केले आहे.
तरूणांनी कुठल्याही व्यसनांना बळी पडू
नये. व्यसन नव्या पिढीला लागू नये याचा आज
आपण संकल्प करू या असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी समता दिंडी व संदेश यात्रा
शहरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. या समता दिंडीमध्ये शहरातील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल,
न्यू सिटी हायस्कूल, अग्रसेन महाराज हायस्कूल, नूतन पाडवी माध्यमिक विद्यालय,
कमलाबाई कन्या हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल या
विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. शाहीर सुभाष कुळकर्णी यांनीही व्यसनमुक्तीपर संदेश दिला. तर साक्री रोडवरील
कल्याण भवन, शिवतीर्थ येथे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ
व मान्यवर उपस्थितांच्या हस्ते मादक पदार्थ प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. समारोपप्रसंगी
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वच्छ
भारत व व्यसनमुक्तीची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदाम राठोड यांनी केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा