नाशिक दि. 25 :- शासनाच्यावतीने देण्यात येणारे 2015 चा राजीव गांधी मानव
सेवा पुरस्कार, विशेष नेपुण्य पुरस्कार तसेच 2014 व 2015 या वर्षातील राष्ट्रीय बाल
कल्याण पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात
येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,नाशिक यांनी कळविले आहे.
या पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाचे वेबसाईटवर www.ewd.nic.in उपलब्ध आहे. प्रस्ताव 1 जुलै 2015 पर्यंत जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी कार्यालय नाशिक पत्ता नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे
रोड, नाशिक येथे पाठविण्यात यावे. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्जाचा विचार
करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी 0253-2236368 या क्रमांकावर
संपर्क साधावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा