नवी दिल्ली,
दि. 25: साहित्य क्षेत्रात योगदान देणा-या लेखकांसाठी
बुधवारी साहित्य अकादमीतर्फे वर्ष 2015 चा युवा साहित्य पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार
आणि साहित्य अकादमी भाषा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील
शाहीर लीलाधर हेगडे आणि डॉ. वीरा राठोड यांचा समावेश आहे.
शाहीर लीलाधर हेगडे यांनी‘पाचूचे
बेट’, ‘अंधारातून प्रकाशाकडे’, ‘हणमू
आणि इतर गोष्टी’‘मनी हरवली मनी सापडली’
या
बालसाहित्याची निर्मिती केली. यासह त्यांनी लहान मुलांकरिता अनेक गाणी तयार केली. लहान
मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी याचा प्रयत्न त्यांनी साहित्यातून केला. त्यांच्या
बाल साहित्यातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. बाल साहित्याकरिता मराठी
विभागाच्या परीक्षणाचे काम भारत सासणे, सतीश काळसेकर, यशवंत मनोहर या साहित्यिकांनी
केले. हा पुरस्कार 14 नोव्हेंबर 2015 ला मुंबई
येथे एका कार्यक्रमात दिला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये रोख असे आहे.
डॉ. वीरा राठोड
यांना 2015 सालचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार त्यांच्या ‘सेन
साई वेस’ या काव्यसंग्रहाकरिता जाहीर झाला आहे.
हा काव्यसंग्रह भटक्या बंजारा संस्कृतीवर आहे. या काव्यसंग्रहात 42 कविता आहेत. युवा
पुरस्काराच्या परिक्षणाचे काम डॉ. दिलीप धोंगडे, डॉ. आनंद पाटील, प्राध्यापक राजन गवस
या ज्येष्ठ साहित्यिकांनी केले. युवा पुरस्काराचे
स्वरूप 50 हजार रूपये रोख असे आहे.
कोकणी भाषेकरिता
साहित्यिक श्रीनिशा नायक यांना ‘खन्ये गेली आजी’
या
काव्यसंग्रहाकरिता युवा पुरस्कार जाहीर झाला तसेच रामनाथ गावडे यांना त्यांच्या ‘सादु
आणि जादुगर मधू’ या कादंबरीकरिता बाल साहित्य पुरस्कार
जाहीर झाला.
यावर्षी युवा पुरस्कारासाठी 23 भाषांमधील 13 काव्यसंग्रह, 3 कांदबऱ्या,
6 लघुकथा संग्रह, 1 साहित्य समीक्षा या पुस्तकांची निवड करण्यात आली. बाल साहित्य पुरस्कारांकरिता
24 भाषेतील 5 कांदबऱ्या, 4 कथासंग्रह 3 काव्यसंग्रह 1 एकपात्री प्रयोगाचे पुस्तक,
11 लेखकांची बाल साहित्यातील योगदानाकरिता निवड करण्यात आली.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा