नाशिक दि. 10 :
समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे
प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय
मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक
करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी
यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय स्तरावर व
मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही
दिन आयोजित करण्यांत येतो.
नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त
कार्यालयात दिनांक 13 जुलै, 2015 रोजी सकाळी
11 वाजता महिला लोकशाही दिन
राबविण्यांत येणार आहे. यादृष्टीने
पीडित महिलांनी त्यांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी व सुलभ मार्गदर्शनासाठी
उपरोक्त दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे विभागीय उप आयुक्त,
महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे
कळविले आहे.
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा