नंदुरबार
दि. 10 : प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणी सोहळा निमित्त मानकरी बन्सीलाल जाधव पाटील यांच्या
कुटूंबामार्फत ब्राम्हणभोजन तसेच प्रकाशा येथील ग्रामस्थ व भाविकांना महाप्रसाद वाटप
आज करण्यात आले.
प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणी 14 जुलै
रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने आजपासून
धार्मिक विधींना सुरुवात झाली. 8 जुलै रोजी मानकरी यांच्यामार्फत त्यांच्या घरी ब्राम्हण
भोजन तसेच आज प्रकाशा ग्रामस्थांसह परिसरातील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ
घेतला. सर्वप्रथम मानकरी बन्सीलाल जाधव पाटील
व सुमनबेन बन्सीलाल पाटील यांच्या घरुन त्यांच्यासह हजारो भाविकांनी वाजत-गाजत, भजन
किर्तनासह महाप्रसादाचा नैवद्य घेवून गौतमेश्वर महादेव मंदीरात पुजा-आरती करुन नैवद्य
दाखविला. यानंतर आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. तसेच भजन-किर्तन करत परिसरातील गोमती नदी, मरीमाता,
दुधेश्वर आदि मंदिरात नैवद्य दाखवून भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
परंपरेनुसार मानकरी यांच्या प्रांगणात
प्रकाशा ग्रामस्थांसाठी तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत गावातील ग्रामस्थ व
परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
0 0 0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा