धुळे, दि. 10
:- धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखालील धुळे व
नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी, नाले
तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांचा पाण्याचा फायदा घेणा-या तमाम
बागाईतदारांनी दि. 1 जुलै, 2015 ते 14 ऑक्टोबर, 2015 या कालावधीसाठी आपले नमुना
नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय
कार्यालयात दि. 31 ऑगस्ट, 2015 पर्यंत सायंकाळी 5-45 वाजेपर्यंत सादर करावे, असे
आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
दि. 1 जुलै, 2015 पासून सुरु झालेला
खरीप हंगाम 2015-16 मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर
हंगामी पीके आदी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्यासाठी
मंजुरी देण्यात येणार आहे. पाणी अर्ज स्वीकारण्याच्या अटी व शर्ती
नियमानुसार राहतील, असेही पत्रकात नमूद केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा