दि. 10
– महाराष्ट्र शासनाच्या लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना दैनंदिन शासकीय कामकाज, प्रशासकीय
व लेखा विषयक कामे, शासकीय नियम, अधिनियम व पध्दतींची सविस्तर माहिती होण्यासाठी तसेच कामाचा जलद निपटारा, निर्णय सुलभता,
कार्यक्षमता वाढ, वित्त व सेवा नियमासंबंधीचे
86 वे प्रशिक्षण सत्र दिनांक 20 जुलै
ते 24 सप्टेंबर, 2015 या 50 कामाच्या दिवसांच्या
कालावधीत घेण्यांत येणार आहे. या प्रशिक्षणासाठी
15 मोड्युल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशीलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी नाशिक, धुळे,
जळगांव, अहमदनगर आणि नंदूरबार यांच्या कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे.
या
प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचाऱ्यास प्रवेश देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी
50 दिवसांच्या अभ्यासक्रमतासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसून इच्छेनुसार विशिष्ट मोड्युल्सना
प्रवेश घेण्याची मुभा कर्मचारी यांना असेल त्यानुसार नाशिक विभागातील सर्व शासकीय कार्यालयीन
प्रमुखांना त्यांच्याकडील लिपीकवर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन बाळासाहेब घोरपडे, सहसंचालक लेखा व कोषागारे, नाशिक
विभाग, नाशिक यांनी केले आहे.
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा