धुळे, दि. 10 :-
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत दारिद्रय रेषेखालील अनुसूचित
जातीच्या कारागिरांसाठी केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत विशेष घटक
योजना राबविण्यात येत असून यात लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी
51,500 रूपये आणि ग्रामीण भागासाठी 40,
500 रूपये आहे. तरी जास्तीत जास्त
कारागिरांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. डी. दळवी
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेत कारागिरांना बँकेमार्फत 100
टक्के मंजूर कर्जाचे वाटप केल्यानंतर कर्ज रक्कमेतून युनिट उभारणीनंतर 50 टक्के
किंवा जास्तीत जास्त 10 हजार रूपये अनुदान दिले जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य
खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, धुळे
दूरध्वनी क्रमांक 02562-246292 वर संपर्क
साधून प्रत्यक्ष माहिती घ्यावी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा