मुंबई, 18 : चीन व महाराष्ट्र यांच्यामध्ये औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. शॅनडाँग येथील उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असून यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी चीन येथील शॅनडाँग प्रोव्हिन्स प्रांताचे उपराज्यपाल वॅग सुजान यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शॅनडाँग प्रोव्हिन्स विज्ञान व
तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक लियू वेमिन, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे
उपमहासंचालक ली राँग यांच्यासह विविध विभाग प्रमुखांचा समावेश होता. यावेळी
राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सर्व दारे
खुली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने विविध बहुराष्ट्रीय कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सूक आहेत. यासाठी आवश्यक सहकार्य शासनाकडून करण्यात येणार
असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शॅनडाँग आणि महाराष्ट्र
यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी सबंधांना प्रोत्साहित करणे, महाराष्ट्र सरकार व
शॅनडाँग यांच्यात संवादाची यंत्रणा तयार करणे यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांना
प्रोत्साहन देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा