गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

नांदेडच्या विकासाचा यशोपथ या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री रावते यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 18 : गेल्या एक वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात झालेल्या विकासाची माहिती असणारी नांदेडच्या विकासाचा यशोपथ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे परिवहन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, पालकमंत्र्यांचे खाजगी सचिव सुधीर तुंगार आदि उपस्थित होते.
           राज्य शासनाच्या वर्षपूर्ती निमित्ताने नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने ही घडीपुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेत राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी असणाऱ्या जलयुक्त शिवार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना,स्वच्छ महाराष्ट्र अभियान, कौशल्य विकास सारख्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विकासाची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर शोषखड्ड्याद्वारे गावांची गटारमुक्ती, पेसा कायद्याद्वारे आदिवासी सक्षमीकरण, जलपुनर्भरण स्तंभाचा नांदेड पॅटर्न, नदी नाल्यांचे शास्त्रीय पध्दतीने पुनरुज्जीवन आदि विषयी माहिती या घडीपुस्तिकेत देण्यात आलेली आहे. या घडीपुस्तिकेत छायाचित्रासह माहिती देण्यात आलेली असल्याने आकर्षक झालेली आहे.

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा