गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

अनुकंपा धोरण आणि प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती करण्यासंबंधी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

मुंबई दि. १८: राज्यातील शासकीय/ निमशासकीय/ महामंडळातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे अनुकंपा धोरण सुधारणे आणि प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत भरती करणे यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित गावांची माहिती अद्यावत करून ती पुढील बैठकीत सादर करावी, यासंबंधीच्या इतर विभागांच्या/ महामंडळांच्या धोरणांचाही अभ्यास केला जावा, असे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सेवा भगवान सहाय, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, मदत पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे आदी अधिकारी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा