गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

दक्षिण आफ्रिकन शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी द. आफ्रिक गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री

मुंबई.दि.18 : मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "2022 पर्यंत सर्वांसाठी घरे" या संकल्पनेच्या माध्यमातुन द.आफ्रिकन गृहनिर्माण संस्थांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्यास त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले.
            वर्षा निवासस्थानी दक्षिण अफ्रिकेच्या प्रिमियर फ वेस्टर्न केप प्रोव्हीन्सेसच्या श्रीमती हेलन झिले यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कौंसल( राजकीय) डेविड विड,दक्षिण अफ्रिकन कौंसलेट जनरल श्रीमती झ्वाली लॅलरिन,अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक यावेळी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,राज्यापुढे विशेषतः मुंबईत झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण व वाढत्या झोपडपट्ट्या ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे  नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे मोठे आव्हान आहे. त्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रात " इज ऑफ डुइंग बिझनेस"च्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी भागांना उत्कृष्ठ जागेत रुपांतरीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या झोपडपट्टी भागात परवडणारी घरे बांधण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेतल्यास शासन संपूर्ण सहकार्य करेल तसेच राज्याच्या विकासात्मक कामांसाठी कंपन्यांना व संस्थांना लागणारे विविध आवश्यक परवाने तातडीने उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल,असे आश्वासनही श्री.फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले.
           महाराष्ट्रात औषध निर्माण कंपन्यांच्या सहय्याने विशिष्ट आजारांवर संशोधन करून औषधांची निर्मिती केली जाते. त्याच पद्धतीने द.आफ्रिकेही भारतातील विशेषतः मुंबईतील औषध उत्पादन कंपन्यांनी संशोधनात्मक औषध निर्मितीसाठी पुढाकार घेऊन गुंतवणूक करावी, असे आवाहन श्रीमती हेलन झिले यांनी यावेळी केले असता याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 
           या भेटीदरम्यान व्यापारवृद्धी,पर्यटन,विजा,प्रस्तावित वस्तू व सेवा कर प्रणाली,औषध निर्माण,आणि गृहनिर्माण आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी श्रीमती हेलन झिले यांनी केपटाऊन येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2017 चे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांना दिले. 

०००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा