मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

उपद्रवी परीक्षा केंद्रांसाठी भरारी दक्षता पथकांची नियुक्ती


        नाशिक दि.19 : माहे. फेब्रुवारीमार्च – 2012 मध्ये उच्च माध्यमिक(12 वी) माध्यमिक शालांत परीक्षा घोषित झालेल्या आहेत. सदर परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार होवू नये या करीता विभागीय पातळीवर भरारी दक्षता पथक समितीची स्थापना विभागीय आयुक्त, नाशिक श्री. जयंत गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे.
            दिनांक 21 फेब्रुवारी, 2012 पासून उच्च माध्यमिक 1 मार्च, 2012 पासून माध्यमिक शालांत परीक्षा सुरू होत आहेत. त्यादरम्यान परीक्षा कालावधीत नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित गैरप्रकार घडु नये यासाठी विभागीय स्तरावर भरारी दक्षता पथक समितीची स्थापना करण्यात आली आहे.तसेच नाशिक विभागात एकुण 59 परीक्षा केंद्रांपैकी नाशिक मधील 36, धुळे 06, नंदुरबार 05, जळगांव 12 उपद्रवी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या उपद्रवी परीक्षा केंद्रांसाठी खालील प्रमाणे भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
.क्र.
जिल्हा
पथक
1
नंदुरबार
1.      उप आयुक्त (महसुल), नाशिक विभाग, नाशिक
2.     उप आयुक्त (विकास), नाशिक विभाग, नाशिक
2
धुळे
1.      उप आयुक्त (पुनर्विकास), नाशिक विभाग, नाशिक
2.     उप आयुक्त (पुरवठा), नाशिक विभाग, नाशिक
3
नाशिक
1.      उप आयुक्त (करमणुक), नाशिक विभाग, नाशिक
2.     उप आयुक्त (मावक), नाशिक विभाग, नाशिक
4
जळगांव
1.      उप आयुक्त (विकास- आस्था), नाशिक विभाग, नाशिक
2.     उप आयुक्त (नियोजन), नाशिक विभाग, नाशिक
5
अहमदनगर
1.      उप आयुक्त (सामान्य), नाशिक विभाग, नाशिक
2.     उप आयुक्त (रोहयो), नाशिक विभाग, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा