मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

साप्‍ताहिक मिनी लॉटरी सोडतीच्‍या बक्षिस रचनेत बदल


मुंबई, दि  18 :  राज्य लॉटरीच्या पारंपरिक साप्ताहिक सोडती व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात येणाऱ्या महाराष्ट्र डायमंड मिनी, महाराष्ट्र प्‍लॅटिनम मिनी, महाराष्ट्र गोल्‍ड मिनी व महाराष्ट्र सिल्‍वर मिनी या साप्‍ताहिक मिनी लॉटरीच्‍या सोडतीच्‍या बक्षिस रचनेत 20 फेब्रुवारीपासून  बदल करण्यात येणार आहे. या मिनी लॉटरीचे पहिले सामायिक बक्षिस एक लाख रुपये ठेवण्‍यात आले असून दुसरे बक्षीस 10 हजार रुपये व तिसरे बक्षीस 5 हजार रुपये आहे. सर्व मालिकांमधील बक्षिसांची एकूण रक्‍कम 5 लाख 25 हजार रुपये असेल.
          याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharahtra.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध असून त्‍याचा संगणक सांकेतांक 20120210094727227001 असा आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा