मुंबई, दि.4: आदिवासी
विकास विभागामार्फत नामांकित शाळांमध्ये दरवर्षी पाठविण्यात येत असलेल्या 2500 विद्यार्थ्यांच्या
संख्येत 10 पटीत वाढ करण्यात आली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी
माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत शिक्षण देणे, या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचा लक्षांक
वाढवून 25हजार इतका करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना यापुढे इयत्ता 1
ली व 5 वी या दोन टप्प्यावर प्रवेश देण्यात येईल. नामांकीत शाळांची वर्गवारी करुन शुल्क
निश्चित करण्यात आले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा 50 हजार रुपये, जिल्हास्तरीय मुख्यालय कार्यक्षेत्रातील
शाळा 45 हजार रुपये आणि तालुकास्तरावरील / नगरपालिका क्षेत्रातील (जिल्हा मुख्यालय वगळून)
व अन्य शाळांना 40 हजार रुपये तसेच महाबळेश्वर,
पाचगणी, चिखलदरा, पन्हाळा, लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणच्या शाळांना 50 हजार रुपये
शुल्क निश्चित करण्यात आले आहे, याची अंमलबजावणी या वर्षापासूनच होईल.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा