धुळे, दि. 1 :- धुळे व नंदुरबार
जिल्ह्यातील सैन्य सेवेत भरती होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी 1 सप्टेंबर,
2015 पासून खुली सैन्य भरती प्रक्रिया बंद करण्यात आली असून आता यापुढे सैन्य भरती
ही ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारून सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक
उमेदवारांनी केंद्र शासनाच्या www.joinindianarmy.nic.in
या संकेतस्थळावर संपर्क साधून सर्व प्रकारच्या सैन्य भरती बाबतची तारीख व सखोल
माहिती प्राप्त करावी. तसेच भरती सुरू
होण्याच्या दोन महिन्यापूर्वी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून
ॲडमीट कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. सदरचे
रजिस्ट्रेशन हे भरती सुरू होण्याच्या 15 दिवस अगोदर स्वीकारले जाणार नाही, अशी
माहिती सेना भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा