धुळे, दि. 1 :-महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय विभागाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून
अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास
प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी
ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक होते. तथापि सन
2015-16 या शैक्षणिक वर्षापासून केवळ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांना किंवा डायरेक्ट द्वितीय वर्षात डिग्री अथवा डिप्लोमा
अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट, 2015 पासून शिष्यवृत्ती
अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे https://mahaeschol.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावरून भरावे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नोंद
घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा