मुंबई दि 1: महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य
संमेलनासाठी नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र
संस्थांकडून 1 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीत
अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र संस्थांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळामार्फत अनुदान दिले जाणार आहे.
संस्था नोंदणी अधिनियम, 1860 आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या संस्थांनाच अनुदान देण्यात
येणार असून महाराष्ट्रात अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य
संस्था अनुदानासाठी अर्ज करु शकणार आहेत. विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान’
या शीर्षाखाली ‘What’s new’ या सदरात ‘Grant in Aid for Annya Marathi
Sahitya Samelan’ या शीर्षाखाली,
तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.msblc.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’या सदरात ‘अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान’
या शीर्षाखाली उपलब्ध होतील.
सदर अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,
सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025
(022- 24325931) येथे 1 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2015
या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. सदर
अनुदानासाठीचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत (1 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2015)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे
बंधनकारक राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या अर्जाचा अनुदानासाठी विचार केला
जाणार नाही, असे महाराष्ट्र
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा