गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

धर्मादाय संघटनेत 773 पदे निर्माण करण्यास मान्यता


धर्मादाय संघटनेतील कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी 773 वीपदनिर्मिती करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1950 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये करण्याच्या उद्देशाने धर्मादाय संघटनेची स्थापना सन 1952 मध्ये करण्यात आली. सध्या धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवर एकूण 1085 पदे मंजूर आहेत. तथापि नोंदणीकृत न्यासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि न्यासांच्या विश्वस्तांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यास सध्या मंजूर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अपुरा होता.  त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
----0----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा