गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

महिला व बाल विकास विभागाची महसूल विभागाच्या धर्तीवर सहा विभागीय कार्यालये


मुंबई, दि. 22 : आयुक्त, महिला बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या नियंत्रणाखाली  महसुली विभागाच्या धर्तीवर सहा विभागीय कार्यालये निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुणे, मुंबई (कोकण), नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी ही सहा विभागीय कार्यालये निर्माण करण्यात आली आहेत.
सन 2003 नंतर विभागातील शासकीय संस्था, अनुदानित संस्था, मुलामुलींचे बालगृह यामध्ये बरीच वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत प्रकल्प कार्यालयांच्या संख्येत वाढ होवून ती 369 वरुन 553 इतकी झाली आहे. विभागाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांवर आयुक्त, महिला बाल विकास, पुणे यांच्या स्तरावरुन नियंत्रण ठेवणे जिकीरीचे झाल्याने तसेच विभागामध्ये बहुतांशी योजना या सामाजिक कायद्याशी निगडीत आहेत. या योजनांची योग्य प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसुली विभागाच्या धर्तीवर सहा विभागीय कार्यालये निर्माण करण्यात आली आहेत. विभागात कार्यरत असलेले उपायुक्त यांची विभागीय उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा