मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125वे जयंतीवर्ष समता व सामाजिक न्याय वर्षांनिमित्तच्या कार्यक्रमांसाठीसव्वाशे कोटींचा निधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे वर्ष राज्य शासनातर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष  म्हणून साजरे करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात त्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी 125 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
      या ऐतिहासिक वर्षात इंदूमिलच्या जागेवरभारतरत्नडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामास तातडीने सुरुवात करण्याचा शासनाचा निर्धार आहे. तसेच केंद्रशासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानस्थापन करण्यात येणार आहे.
      समता व सामाजिक न्याय वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले आहेत.  या अंतर्गत पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी (बार्टी)पुण्यालगत नवीन प्रशासकीय इमारत आणि संकुल निर्माण करणे, अनुसूचित जातीच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे वसतिगृह तसेच मुलींसाठी 50 विद्यार्थी क्षमतेची तालुकास्तरीय 50 वसतिगृहे बांधणे आणि दलित वस्त्यांच्या सर्वकष विकासाची योजना राबविण्यात येणार आहे. तसेच दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शनही मुंबईत भरविण्यात येईल.
     डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेली घटनास्थळे आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देण्यासोबतच त्‍यांचा विकास करणे, डॉ.आंबेडकर यांच्यादुर्मिळ छायाचित्र आणि साहित्याचे प्रकाशन करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासह संविधान उद्देशिका आणि समता दिनदर्शिका प्रकाशन, परिसंवाद,चर्चासत्रआणिकार्यशाळेचेआयजन करण्यात येणार आहे. डॉ.आंबेडकर यांचे जीवनकार्य तसेचसामाजिक न्याय विभागाचेसांस्कृतिक कार्यक्रम, जलसे, नाटक इत्यादी तयार करून त्यांना विविध माध्यमातूनव्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा