मुंबई, दि.24 : व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी राज्य शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सन 2015-2016 देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2015 आहे. तरी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यामधील स्थानिक कार्यकर्त्यांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रातील एकूण 51 पुरस्कार्थींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पासपोर्ट आकाराचे रंगीत दोन छायाचित्र, कामाची माहिती प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्रातील कात्रणे, प्रशस्ती पत्रके, पोलीस दाखला आदी माहितीसह मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्था व कार्यकर्त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग 1 चौथा मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – 400071 येथे सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा