मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज गोंदीया जिल्ह्यातीलविकास कामांबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचेप्रधान सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, गोंदीयाचे जिल्हाधिकारी विजयसुर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डांगुर्ली बंधाऱ्याचे काम गतिमान करण्यासाठी आंतरराज्यीय सिंचन मंडळासोबतलवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल. नवेगांव डेवरी उपसा सिंचन योजनेचे काम मार्गीलावण्यासाठी आपण राज्यपालांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावू, असे मुख्यमंत्री म्हणाले.जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना ग्रामस्थांना विविध योजना एकत्र करुन घरे देतायेतील का याचा विचार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गोंदीया शहरात जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय सुरुकरण्याबाबतही याप्रसंगी चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठीआराखडा, अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता घेणे आदी कामे तातडीने पूर्ण करुन याकामाला गती देण्यात यावी. तसेच जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालयासाठी आवश्यकपदनिर्मितीसही मंजुरी देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनादिले.
गोंदीया शहरात समाजभवन उभारणे, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणेयासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळीदिले. याशिवाय गोंदीया शहरातील बाह्य वळण रस्त्याच्या बांधकामांसही आवश्यक निधीचीउपलब्धता करुन देऊन हा वळण मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, असे ते म्हणाले.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा