मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

गोग्राम योजनेत सहभाग घेण्यासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा -- एकनाथराव खडसे

मुंबई, दि. 25 : गोवंशाचे संरक्षण व संवर्धनासाठी शासनाने गोग्राम योजना सुरु केली आहे. या योजनेत सहभागी होऊन ती यशस्वी करण्यासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे केले.
          जैन समाजाच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार व्हावायासाठी तयारकरण्यातआलेल्यामुंबई येथील जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या संकेतस्थळाचे उद्घाटन आज ‘रामटेक’ निवासस्थानी श्री.खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जैन समाजाचे गुरु वितराग यश सुरीश्वरजी महाराज, जैन अल्पसंख्याक समाजाचे सदस्य संजय शाह, जवाहर मोतीचंद आदी उपस्थित होते.

          राज्यात गोग्राम योजनेअंतर्गत गोरक्षा आणि गोपालन करण्यासाठी शासनामार्फत जमीन, चारा आणि पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी गोग्राम योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी शासनाच्या उपलब्ध असलेल्या जागेची मागणी केल्यास ती देण्यात येईल, असेही श्री.खडसे यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा