सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण विद्यार्थी परिषदेतून होते-मुख्यमंत्री

नागपूर, दि.२२-राष्ट्रीय भावनेशी प्रेरीत होऊन विद्यार्थी परिषदेत येतात. ख-याअर्थाने राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण या ठिकाणी होते,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 विद्यार्थी परिषदेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही कालावधीनंतर नेतृत्वगुण निर्माण होतो.जेव्हा जेव्हा देशावर संकट येतो,त्यावेळी युवाशक्ती सर्वात पुढे असते. राष्ट्रीय भावनेचे बिजारोपन करणाऱ्या या नूतन इमारतीचा उपयोग चांगल्याप्रकारे करावा. या इमारतीच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवावे,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पीठाधीश श्री. देवनाथ मठ,अंजनगाव,आचार्य जितेंद्रनाथ महाराज, खासदार अजय संचेती, प्रमिलाताई मेंढे, शांताआक्का ,  आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, राष्ट्रीय संघटक मंत्रीसुनिल अंबेकर, राष्ट्रीय महामंत्री   श्रीहरी बोरीकर,  प्रांत अध्यक्ष, डॉ. केदार, ठोसर,  सचिन रणदिवे  यांची प्रमुख उप स्थिती होती.
सशक्त राष्ट्रनिर्माण करणे आणि ध्येयाने प्रेरित असलेले युवक निर्माण करणे गरजेचे आहे हे महत्वाचे कार्य विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केले जाते. राष्ट्र निर्माण आणि विकासासाठी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रकार्य, संघटन, ज्ञान आणि ज्ञानासोबत चारित्र्य एकत्रित असणे महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून नवीन पिढी एकत्रित येण्याची महत्वपूर्ण प्रक्रिया घडत असून देशात युवकांची लक्षणीय संख्या आहे.या युवकांमध्येच प्रचंड ऊर्जा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या युवाशक्तीच्या ज्ञानाला योग्य दिशा मिळाल्यावर जगात देशाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. वैयक्तिक ध्येयाचा पाठपुरावा करत असतांना समाजाच्या हितासाठीही युवकांनी वेळ देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रशिक्षण रुजविण्याची गरज व्यक्त करुन ते म्हणाले राष्ट्रकार्याच्या यज्ञाचे प्रतिक म्हणून हे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी   सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्या हस्ते छात्रसेना मासिकाचे विमोचन करण्यात आले.
तत्पूर्वी  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच खासदार अजय संचेती यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी राष्ट्रीय संघटक मंत्रीसुनिल अंबेकर, , राष्ट्रीय महामंत्री   श्रीहरी बोरीकर,  प्रांत अध्यक्ष, डॉ. केदार, ठोसर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रफुल्ल आकांत यांनी तर सूत्रसंचालन शुभांगी नक्षिणे यांनी केले.
                                                            *****


विकास कामावर आधारित माहिती विभागाने तयार केलेल्या चित्ररथाला मुख्यमंत्र्यांनी दाखविली झेंडी




नागपूर, दि.22 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त विकास कामावर आधारित तयार केलेल्या चित्ररथाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखविली.
कालिदास समारोहाच्या पार्श्वभूमीवर देशपांडे सभागृहाच्या परिसरात भव्य चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्हयातील पर्यटन, ऐतिहासिक वास्तू विविध  कलाकुसरावर आधारित हे प्रदर्शन  असून त्याचे आज उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. या प्रदर्शनाला जोडूनच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांनी सचित्र माहिती देणारे चित्ररथ तयार केले आहे. या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून आज शुभारंभ करण्यात आले.
एलईडीच्या माध्यमातूनशासनाच्या विविध योजनांची माहिती दाखविली जाणार आहे.  नागपूर जिल्हा  व नागपूर विभागातील सर्व जिल्हयांमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात  येत आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार  अनिल सोले, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माहिती संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, वर्धेचे जिल्हा माहिती अधिकारी  अनिल गडेकर, भंडाऱ्याच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, गोंदियाचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आदी उपस्थित होते.

0 0 0 0

कालिदास समारोहाला आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे स्वरुप - देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.22 :कालिदास महोत्सव पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला असून आता हा महोत्सव खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. विदर्भातील कला, पर्यटन, ऐतिहासिक स्थळे तसेच वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा यांची ओळख या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात कालिदास समारोहाच्या आयेाजनासोबतच  पूर्व विदर्भातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती असलेल्या आकर्षक अशा पर्यटन प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी  मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.  
चीनचे काऊंसलेट जनरल श्री.चाँग आणि श्रीमती ली,  तसेच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रा. अनिल सोले, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.
पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनीच्या उद्घाटनानंतर विविध दालनांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालिदास महोत्सवाला पुन्हा सुरुवात होत असून या महोत्सवास चीनचे शिष्टमंडळ उपस्थित असल्यामुळे हा महोत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव झाला आहे. पर्यटन प्रर्दशनीला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील पर्यटनाला अधोरेखीत होत असलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून विदर्भातील समृद्ध वनसंपदा, वन्य जीव, पुरातत्व व ऐतिहासिक महत्वाची स्थळे  यांच्या माध्यमातून विदर्भाची समृद्ध संस्कृती पहायला मिळत आहे.
विदर्भातील पर्यटनाला चालना देणाऱ्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करतांनाच व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वन्यजीव पर्यटन ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनाकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकृष्ट करु शकेल असा वारसा असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर प्रेस फोटोग्राफर तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांची ओळख असलेली प्रदर्शनी हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनीत लावण्यात आलेल्या छायाचित्रांची पाहणी केली. पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चीनचे भारतातील काऊंसलेट जनरल श्री. चाँग यांनी उद्घाटन फलकावर स्वाक्षरी केली.
कालिदास महोत्सव आयेाजन समिती समारोह आयोजन समिती  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आला असून 23 नोव्हेंबर पर्यंत या महोत्सवात देशातील विख्यात कलावंताचे संगीत कार्यक्रम आयोजि‍त करण्यात आले आहे. कवीश्रेष्ठ कालिदासांच्या स्मृतींच्या जागर करणारा हा महोत्सव म्हणजे संगीत सोहळा असून कालिदासांचे संस्कृत मधील नाटके, खंड काव्य व महाकाव्यांची  ओळख या महोत्‍सवाच्या माध्यमातून करण्याचा उद्देश आहे.
चीनी विद्यार्थ्यांचे संगीत अविष्कार
चीनच्या शिष्टमंडळाने कालिदास महोत्सवाला हजेरी लावून भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख  करुन घेतली. हिंदी भाषा शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी पर्यटन प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभानंतर डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात चीनी भाषेतील बाल वयातील गीत तसेच हिंदीमधील कल हो ना हो हे गीत सादर केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीन या देशाचे काऊंसलेट जनरल श्री. चाँग व श्रीमती ली तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उमा वैद्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
34 दालनाच्या माध्यमातून समृद्ध परंपरेचा वारसा
कालिदास महोत्सवाचा एक भाग असलेल्या पूर्व विदर्भातील पर्यटन प्रदर्शनीमध्ये विदर्भातील ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या स्थळांच्या समृद्ध परंपरेचे दर्शन पर्यटकांना एकत्र पहायला मिळत आहे.
पर्यटन प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामीण विकास संस्था, अल्प बचत गटाचे उत्पादन असलेले वर्धा वर्धेनी पर्यटन जैव व विविधतेचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन, भंडाऱ्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सिल्क कापडाचे प्रदर्शन, गोंदियाच्या निर्सग संपदेचा वारसा जतन करणाऱ्या विविध स्थळांची माहिती सारस पक्ष्यांचे संवर्धन तसेच चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती येथील चीनी माती वस्तूंचे प्रदर्शन, चंद्रपूर जिल्हयातील वन्यजीव प्रदर्शन जैव व विविधता मंडळ, हातमाग मंडळ, पुरातत्व व प्राचीन इतिहासाची दालने तसेच पर्यटना संदर्भात विविध खाजगी संस्थाची दालने हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र  असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक दालनाला भेट देऊन माहिती घेतली.
प्रारंभी विभागीय आयुक्त अनूप कुमार व जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत केले. व  पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनी बद्दल माहिती दिली. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी पर्यटक मोठया संख्येने उपस्थित होते.

******

राज्याला दुष्काळाच्या संकटापासून मुक्त कर महसूल मंत्री खडसे यांचे विठ्ठलाला साकडे

पंढरपूरदि.22: राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी या संकटापासून मुक्त कर, राज्यातील जनता सुखी समाधानी होऊ दे असे विठ्ठल चरणी साकडे घातले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी  केले.
                कार्तिकी एकादशी निमित्त ‍श्री.विठ्ठल-रु‍क्मिणीची शासकीय महापुजा त्यांनी सपत्नीक केली. या पुजेनंतर तुकाराम भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार  सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, श्री. उल्हास पवार, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे  उपस्थित होते.
                महसूल मंत्री खडसे म्हणाले, पंढरपूर येथे दरवर्षी लाखो वारकरी भाविक येतात. शेकडो वर्षाची ही वारकरी परंपरा आहे. या शहरात येणाऱ्या भाविकांची चांगली व्यवस्था झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शहरावर सर्व प्रकारच्या नागरी सेवांचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
यासाठी 65 एकरात वारकऱ्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तेथे पंढरपूरचे उपनगर उभे राहिले पाहिजे. त्या ठिकाणी गटारी, रस्ते, पाणी पुरवठा, शौचालय आदि  कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच वारकऱ्यांना भजन कीर्तनासाठी प्रति वाळवंट तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. संतांच्या विचाराचा ठेवा व संस्कार पुढील पिढी पर्यंत गेले पाहिजेत यासाठी संत विद्यापीठाची आवश्यकता आहे. यासाठी जागा उपलब्धतेबाबत प्रयत्न  करण्यात येत असल्याचे सांगितले.
                प्रारंभी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. त्यानंतर प्रास्ताविकात पंढरपूर येथे येणाऱ्या भक्तांसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याद्वारे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा शासनाचा, प्रशासनाचा व मंदिर समितीचा प्रयत्न आहे. येणाऱ्या भाविकांना सर्व सुख सुविधा देण्यासाठी कटीबध्द आहोत. याला शासनाचे पाठबळ आहे. येणाऱ्या आषाढीवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे  सांगितले.
यावेळी महसूल मंत्री खडसे यांच्या समवेत शासकीय महापुजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातीलपो. मु जादुवाडी ता. मालेगाव (कॅम्प) येथील वारकरी दामोदर रतन सोमासे (वय 85 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दामोदर सोमासे (वय 78 वर्षे) यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला. श्री. सोमासे हे मजुरी व शेती व्यवसाय करीत असून गेली पाच वर्षे ते वारी करीत आहेत. महापुजेचा मान मिळाला हा आमच्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मंदिर समितीच्यावतीने या मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार महसूलमंत्री श्री. खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वर्षभर मोफत प्रवास करण्याबाबत एस.टी.चा पास त्यांच्या हस्ते  देण्यात आला.
या प्रसंगी  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, प्रांताधिकारी संजय तेली, तहसिलदार गजानन गुरव आदि उपस्थित होते.

                                                         0000

धुळे जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची केंद्रीय समिती पथकाकडून पाहणी



धुळे, दि. 21 :- धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज  आलेल्या केंद्रीय समितीच्या पथकाने धुळे तालुक्यातील अजंग, जुनवणे, विंचूर आणि तरवाडे या गावांना भेटी देऊन  पीक परिस्थितीची पाहणी केली.  केंद्रीय समिती पथकात ग्रामीण विकास संचालनालयाचे सहाय्यक आयुक्त जगदीश कुमार,  नवीदिल्ली वित्त मंत्रालयाचे उपसंचालक (पी.एफ.1) ए. के. दिवाण, नवीदिल्ली पाणी व स्वच्छता मंत्रालयाचे कक्ष सचिव  के. नारायणा रेड्डी यांचा समावेश होता.  केंद्रीय समिती पथकासोबत  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे उपसचिव अशोक अत्राम, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे,  जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, उपविभागीय कृषि अधिकारी पी. एम. सोनवणे, मंडळ कृषि अधिकारी रमेश पोतदार (धुळे), पी. व्ही. निकम (पिंप्री), पी. ए. पाटील (सोनगीर) आदी उपस्थित होते.
प्रारंभी केंद्रीय समिती पथकाने धुळे जिल्ह्याच्या सीमेवर अजंग या गावाच्या शेतकऱ्यांच्या  पीक परिस्थितीची पाहणी केली.  त्यात विमलबाई सुरेश माळी, मदिना मर्द खाटीक यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापूस आणि बाजरी पिकाची पाहणी केली आणि गेल्या दोन वर्षांचे उत्पन्न आणि यावर्षीच्या उत्पन्नाच्या तफावतीबाबत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली.  शेतकऱ्यांनी समिती पथकाच्या सदस्यांकडे आपल्या समस्या आणि व्यथा मांडल्या.
            केंद्रीय समिती पथकाने जिल्ह्यातील सर्व संबंधित खाते प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती जाणून घेतली.  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यात झालेल्या अनियमित  पावसाची धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्याची  आकडेवारी, खरीप पिकांची जिल्ह्यातील परिस्थिती, प्रत्यक्ष पीक काढणी करून काढण्यात आलेली पैसेवारी, पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा इ. सविस्तर माहिती  पॉवर पॉईन्ट प्रेझेन्टेशनद्वारे सादर केली.  बैठकीस खाते प्रमुखांसोबत अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, शिरपूरचे उप विभागीय अधिकारी राहूल पाटील, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

            दुपारच्या सत्रात केंद्रीय समिती पथकाने धुळे तालुक्यातील जुनवणे, विंचूर आणि तरवाडे या गावांच्या परिसरातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.  त्यात जुनवणे येथील तुकाराम देवसिंग पाटील,  विंचूर येथील शिवाजी विक्रम देसले, तरवाडे येथील सुरेखा दगडू मोरे, अर्जुन मालजी माळी, अर्जुन शेनपडू पवार यांच्या शेतातील कापूस, बाजरी आणि मका आदी पिकांचा समावेश होता.                00000

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

पोलिसांत तीन हजार तक्रारी दाखल वॉट्सॲपद्वारे तक्रारींच्या नोंदीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद

मुंबई, दि. 18 : राज्यातील नागरिकांना आपल्या तक्रारी भ्रमणध्वनीच्या (मोबाईल) माध्यमातून पोलिसांत नोंदविता याव्यात म्हणून बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या वॉट्सअॅप सुविधेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सुविधेमुळे पोलिसांशी तत्काळसंपर्क साधून तक्रार दाखल करणे शक्य झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासही मदत होत आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून तिच्या माध्यमातून आजअखेर जवळपास तीन हजार तक्रारींची नोंद पोलिसांत झाली आहे.
            नागरिकांना तत्काळ आणि निर्भयपणे आपल्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी  राज्यातील रेल्वे परिक्षेत्रासह 45शहर व जिल्हा पोलीस स्थानकांनी विशिष्ट भ्रमणध्वनीवर वॉट्सॲप सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. राज्यातील दोन जिल्हे वगळता सर्व पोलीस परिक्षेत्रे तसेच रेल्वे परिक्षेत्रातही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे. प्रारंभी ही सुविधा मुंबई रेल्वे परिक्षेत्रात उपलब्ध झाल्यानंतर गेल्या जुलैपासून अनेक ठिकाणी ती टप्प्याटप्प्याने कार्यरत झाली. ही वॉट्सॲप सुविधा असलेल्या भ्रमणध्वनींच्या क्रमांकांची यादी पोलीस विभागाच्या संकेतस्थळावर (www.mahapolice.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून नागरीक स्वत:च्या तक्रारींसह आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांची माहिती पुराव्यासह देऊ शकतात. वेळेच्या अभावी तसेच इतर काही कारणांमुळे पोलीस ठाण्यात तातडीने जाता येत नाही म्हणून अनेकदा आसपास घडलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यास नागरीक टाळाटाळ करतात. यामुळे पोलिसांना गुन्ह्यांची माहिती तत्काळ मिळून त्यावर वेगाने कार्यवाही करणे शक्य होत नाही. ही समस्या आता दूर झाली आहे.
            नागरीकही या सुविधेचा वापर आता मोठ्या प्रमाणावर करु लागले असून आतापर्यंत औरंगाबाद, पुणे, सोलापूर या शहर पोलीस स्थानकांसह पालघर, कोल्हापूर, जालना, नांदेड, अकोला, लातूर, सांगली या जिल्ह्यांतील पोलीस स्थानकांमध्येही तक्रारी नोंद होऊ लागल्या आहेत. औरंगाबाद शहरासाठी उपलब्ध करुन दिलेल्या वॉट्सॲप क्रमांकावर 20 जुलैपासून 3 नोव्हेंबर 2015 पर्यंत तब्बल 1600 तक्रारींची नोंद झाली आहे. त्याखालोखाल सोलापूर शहर आणि कोल्हापूर पोलिसांत तक्रारींची लक्षणीय प्रमाणात नोंद झाली आहे.

-----०००-----

सहकारी कुक्कुटपालन संस्थांच्या शासकीय कर्ज आणि व्याजाच्या एकरकमी परतफेडीबाबत प्रस्ताव सादर करावा - सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. १८: राज्यातील सहकारी कुक्कुटपालन संस्थांच्या शासकीय कर्ज व व्याज एकमुस्त परत करण्यासंदर्भातील  धोरणाचाप्रस्तावपुढीलमंत्रिमंडळाच्याबैठकीतसादरकरावा, असे आदेश आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात आज यासंबंधी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कृषी मंत्री एकनाथ खडसे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव वित्त सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव वित्त सीताराम कुंटे, कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात १९८६-८७ ते २००४-०५ पर्यंत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, सहकार तत्वावरील उद्योगांना प्रोत्साहन देणे, अंड्याच्या रूपात प्रथिनयुक्त सकस आहार निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागातील ७३ सहकारी कुक्कुटपालन संस्थांच्या संस्थांना कर्ज आणि भागभांडवल स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात आले होते. आहे. या संस्थांनी एकमुस्त स्वरूपात कर्जाची परतफेड केल्यास त्याबाबतचे धोरण काय असावे, याचा अभ्यास करून ते येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावे अशा सूचना वित्तमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

00000

अनुकंपा धोरण आणि प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती करण्यासंबंधी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

मुंबई दि. १८: राज्यातील शासकीय/ निमशासकीय/ महामंडळातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे अनुकंपा धोरण सुधारणे आणि प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत भरती करणे यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित गावांची माहिती अद्यावत करून ती पुढील बैठकीत सादर करावी, यासंबंधीच्या इतर विभागांच्या/ महामंडळांच्या धोरणांचाही अभ्यास केला जावा, असे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सेवा भगवान सहाय, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, मदत पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे आदी अधिकारी उपस्थित होते.

00000

धुळे शहरातील महावितरणसंदर्भातील विविध कामांना गती

मुंबई दि. 18 - धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या थकित वीज देयकांसाठी पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
धुळे शहरातील वीज वितरण संदर्भातील विविध कामांची आढावा बैठक ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील मंत्रालयीन दालनात झाली. त्यावेळी श्री. बावनकुळे यांनी हे निर्देश दिले. यावेळी धुळे शहराच्या महापौर जयश्री अहिरराव, आमदार अनिल गोटे, महावितरणचे कार्यकारी संचालक ताकसांडे, संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे, अधिक्षक अभियंता पडाळकर, वाणिज्य अभियंता खंडाईत आदी उपस्थित होते.
धुळे शहरातील महावितरणच्या विविध कामांचा आढावा घेऊन श्री. बावनकुळे म्हणाले की, पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या थकित वीजबिलातील 50 टक्के वीज बिल टप्प्याटप्याने भरण्याची सवलत देण्यात येणार आहे. मूळ थकबाकी रक्कमेच्या उर्वरित 50 टक्के रक्कम व्याज व दंडाच्या 50 टक्के रक्कम महावितरणला शासनाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीकडून 50 टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेने पाठविल्यास त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महानगर पालिका, नगरपालिका व नगर पंचायत यांची पथदिवे, वीज बिलाची थकबाकी दिवसें दिवस वाढत आहे. याकरिता स्ट्रीट लाईट बिलाची योजना आणण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील महावितरणने रोहित्रे, पोल उभारले आहेत. या जागेचा मोबदला स्वरूप महावितरण मूळ जागेच्या किंमती एवढी कामे पालिकेला आयपीडीएस अंतर्गत करून देणार आहे. तसेच रस्त्यात अडथळे आणणारे विद्युत खांब, रोहित्रे यांनाही लवकरात लवकर काढण्यात येतील. याकरिता डीपीडीसीअंतर्गत निधी दिला जाईल.
वीज जोडणी, भारनियमनाबाबत लोकांच्या समस्या सोडविण्याकरिता लवकरच धुळे शहरात अधीक्षक अभियंता कार्यालयाची स्वतंत्र इमारत उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याबाबत लवकरच प्रस्ताव होल्डिंग कंपनीसमोर आणला जाईल. शहरातील वीज चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी लघु व उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
000000


पालघर येथील विविध विभागांची कार्यालये महिन्याभरात कार्यान्वित करावी - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,दि.18 : पालघर जिल्ह्यासाठी असलेली विविध विभागांची कार्यालये महिन्याभरात कार्यान्वित करण्यात यावीत. पालघरमध्ये स्मार्ट सिटीच्या धर्तीवर टाऊनशीप विकसीत करतानाच पुढील तीन वर्षात जिल्हा मुख्यालय उभारणीचे काम पूर्ण करावे, ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती पालघर येथे करण्यात आली आहे त्यांनी तातडीने रुजू व्हावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयामध्ये नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या विविध विषयांचा आढावा घेणारी बैठक घेण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार चिंतामण वगना, कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, विलास तरे, निरंजन डावखरे, रामनाथ मोते, आदींसह ठाणे व पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पालघर जिल्हा निर्मिती होऊन वर्ष झाले आहे. याठिकाणी जिल्हा मुख्यालयाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. मुख्यालयाचे काम त्वरीत सुरू करून पुढील तीन वर्षात ते पूर्ण करण्यात यावे. याठिकाणी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर टाऊनशीप तयार करण्यात येणार आहे. ती शासनाच्या कुठल्या यंत्रणेमार्फत करायची याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. अद्याप पालघर येथे 47 विभागांची कार्यालये सुरू झालेली नाही ही गंभीर बाब आहे. याभागातील जनतेला शासनाच्या विविध सोयी-योजनांचा लाभ होण्यासाठी तातडीने ही कार्यालये सुरू करावीत. येत्या महिन्याभरात महत्वाची कार्यालये सुरू झाली पाहिजेत त्याचबरोबर ज्या अधिकारी आणि कर्माचाऱ्यांची नियुक्ती पालघरला करण्यात आली त्यांनी तातडीने हजर होणे आवश्यक आहे. जे अधिकारी कर्मचारी रूजू होणार नाहीत त्यांच्यावर कारावाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला यावेळी दिले.
विविध विभागांनी रिक्त पदांबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा कोकण विभागीय आयुक्तांनी त्याबाबत समन्वय करून तातडीने रिक्त पदांबाबतचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या भागातील नागरीकांना प्रशासकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीस सावर्जनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधाकिरणाचे आयुक्त युपीएस मदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, आदींसह विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सादरीकरण केले. यावेळी पालघर जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.

00000

दक्षिण आफ्रिकन शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी द. आफ्रिक गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री

मुंबई.दि.18 : मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "2022 पर्यंत सर्वांसाठी घरे" या संकल्पनेच्या माध्यमातुन द.आफ्रिकन गृहनिर्माण संस्थांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्यास त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले.
            वर्षा निवासस्थानी दक्षिण अफ्रिकेच्या प्रिमियर फ वेस्टर्न केप प्रोव्हीन्सेसच्या श्रीमती हेलन झिले यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कौंसल( राजकीय) डेविड विड,दक्षिण अफ्रिकन कौंसलेट जनरल श्रीमती झ्वाली लॅलरिन,अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक यावेळी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,राज्यापुढे विशेषतः मुंबईत झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण व वाढत्या झोपडपट्ट्या ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे  नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे मोठे आव्हान आहे. त्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रात " इज ऑफ डुइंग बिझनेस"च्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी भागांना उत्कृष्ठ जागेत रुपांतरीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या झोपडपट्टी भागात परवडणारी घरे बांधण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेतल्यास शासन संपूर्ण सहकार्य करेल तसेच राज्याच्या विकासात्मक कामांसाठी कंपन्यांना व संस्थांना लागणारे विविध आवश्यक परवाने तातडीने उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल,असे आश्वासनही श्री.फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले.
           महाराष्ट्रात औषध निर्माण कंपन्यांच्या सहय्याने विशिष्ट आजारांवर संशोधन करून औषधांची निर्मिती केली जाते. त्याच पद्धतीने द.आफ्रिकेही भारतातील विशेषतः मुंबईतील औषध उत्पादन कंपन्यांनी संशोधनात्मक औषध निर्मितीसाठी पुढाकार घेऊन गुंतवणूक करावी, असे आवाहन श्रीमती हेलन झिले यांनी यावेळी केले असता याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 
           या भेटीदरम्यान व्यापारवृद्धी,पर्यटन,विजा,प्रस्तावित वस्तू व सेवा कर प्रणाली,औषध निर्माण,आणि गृहनिर्माण आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी श्रीमती हेलन झिले यांनी केपटाऊन येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2017 चे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांना दिले. 

०००००


राज्यात साडेसात कोटीहून अधिक नागरिकांना तीन रुपये दराने तांदूळ पुरेसा साठा आणि मोठ्या खरेदीमुळे तांदळाचे भाव नियंत्रणात : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 18 : राज्यात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून मोठी आवक आणि शासनाकडून झालेली चांगली खरेदी यासोबत तांदळाचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. तसेच राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना शासनाकडून प्रतिकिलो तीन रुपये या सवलतीच्या दरात तांदळाचे वाटप केले जात आहे. या सर्व प्रक्रियेमुळे तांदळाचे भाव नियंत्रणात राहणार असून जनतेने काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ घेत असलेल्या सुमारे 8 कोटी 77 लाख 19 हजार लाभार्थ्यांपैकी अंत्योदय अन्न योजनेतील व बीपीएलमधील सर्व तसेच एपीएल (केशरी) मधील काही अशा एकूण 7 कोटी 17 हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अन्नधान्याचा लाभ मिळत आहे. अंत्योदय अन्न योजनेमधील लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका दरमहा 35 किलो व प्राधान्य कुटुंबातील प्रतिव्यक्ती दरमहा 5 किलो याप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत असून या सर्व लाभार्थ्यांना तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदळाचे वाटप केले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील 7 कोटी 17 हजार लाभार्थ्यांना दरमहा 1 लाख 68 हजार 425 मे. टन तांदळाचे वाटप केले जात आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या राज्यातील सुमारे 1 कोटी 77 लाख लाभार्थ्यांपैकी औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व म्हणजे 13 जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्त्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील सुमारे 68 लाख शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे प्रतिव्यक्ती दरमहा 5 किलो या परिमाणात तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. या लाभार्थ्यांना दरमहा 13 हजार 600 मे. टन तांदळाचे वाटप केले जात आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी (7 कोटी 17 हजार) व शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील शेतकरी (68 लाख) यांच्या एकत्रित आकडेवारीनुसार राज्यातील एकूण 7 कोटी 68 लाख 17 हजार नागरिकांना एकूण 1 लाख 82 हजार 25 मे. टन तांदळाचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील  सुमारे 52 हजाररास्तभावदुकानांमधूनतीनरुपयेप्रतिकिलोयादरानेदरमहानियमितपणेवाटपकरण्यातयेतआहे. त्यामुळेराज्यातीलजास्तीतजास्तसामान्यनागरिकांनासवलतीच्यादरानेशासनाकडूनतांदळाचेवाटपकेलेजातअसल्याचेस्पष्टहोते. तसेचराज्यातपुरेसासाठाही उपलब्ध आहे. याशिवाय तांदळाची मोठी आवक होत असून खरेदीही भरपूर प्रमाणात झाली आहे. त्यामुळे तांदळाचे भाव वाढणार असल्याबाबतचे वृत्त निराधार असून सर्वसामान्य जनतेने काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

नांदेडच्या विकासाचा यशोपथ या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री रावते यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 18 : गेल्या एक वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात झालेल्या विकासाची माहिती असणारी नांदेडच्या विकासाचा यशोपथ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे परिवहन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, पालकमंत्र्यांचे खाजगी सचिव सुधीर तुंगार आदि उपस्थित होते.
           राज्य शासनाच्या वर्षपूर्ती निमित्ताने नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने ही घडीपुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेत राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी असणाऱ्या जलयुक्त शिवार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना,स्वच्छ महाराष्ट्र अभियान, कौशल्य विकास सारख्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विकासाची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर शोषखड्ड्याद्वारे गावांची गटारमुक्ती, पेसा कायद्याद्वारे आदिवासी सक्षमीकरण, जलपुनर्भरण स्तंभाचा नांदेड पॅटर्न, नदी नाल्यांचे शास्त्रीय पध्दतीने पुनरुज्जीवन आदि विषयी माहिती या घडीपुस्तिकेत देण्यात आलेली आहे. या घडीपुस्तिकेत छायाचित्रासह माहिती देण्यात आलेली असल्याने आकर्षक झालेली आहे.

000

चीन व महाराष्ट्र यांच्यामध्ये औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण -मुख्यमंत्री

मुंबई, 18 : चीन व महाराष्ट्र यांच्यामध्ये औद्योगिक गुतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. शॅनडाँग येथील उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असून यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी चीन येथील  शॅनडाँग प्रोव्हिन्स प्रांताचे उपराज्यपाल वॅग सुजान यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  या शिष्टमंडळात शॅनडाँग प्रोव्हिन्स विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक लियू वेमिन, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उपमहासंचालक ली राँग यांच्यासह विविध विभाग प्रमुखांचा समावेश होता. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सर्व दारे खुली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने विविध बहुराष्ट्रीय कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सूक आहेत. यासाठी आवश्यक सहकार्य शासनाकडून करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शॅनडाँग  आणि महाराष्ट्र यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी सबंधांना प्रोत्साहित करणे, महाराष्ट्र सरकार व शॅनडाँग यांच्यात संवादाची यंत्रणा तयार करणे यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

0 0 0

राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2014 जाहीर पद्मश्री डॉ.मुझ्झफर हुसेन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार

मुंबईदि. 17 : माहिती  जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉमुझ्झफर हुसेन यांना जाहीरकरण्यात आला आहेअशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केलीउत्कृष्टपत्रकारिता पुरस्कार 2014 देखील आज जाहीर करण्यात आलेदि. 1 डिसेंबर, 2015 रोजीसायंकाळी 6.00 वाजता सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
            लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार 2014रुपये एक लाख मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहेतसेच 2014 साठीचे राज्यस्तर आणि विभागीयस्तरावरील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पुढीलप्रमाणे :
राज्यस्तरीय पुरस्कार
            आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्रीमती जान्हवी विनोद पाटीलदै.तरुण भारतरत्नागिरीअनंतगोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्रीमतीअनन्या दत्तादैटाइम्स ऑफ इंडियापुणेबाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्री.मुकेश रामकिशोर  शर्मादै.लोकमतसमाचारगोंदियामौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर41 हजार रुपये(मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्री.शेख प्यार मोहम्मद सायं दै.नांदेड रहेबरनांदेडयशवंतराव चव्हाणपुरस्कारशासकीय गट (मराठी) (मा .) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्रश्री.प्रशांत आनंदराव सातपुतेमाहिती अधिकारीसातारापु..देशपांडे उत्कृष्टदूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)          41 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)        श्री.संतोष मधुकर लोखंडेझी 24 तासबुलडाणातोलाराम कुकरेजाउत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 41 हजार रुपये, (मानचिन्ह प्रशस्तीपत्रश्री.विद्याधर रघुनाथ राणे दै.सकाळमुंबईकेकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकारपुरस्कार शासकीय गट (मा. .) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)श्री.विजय वैजनाथअप्पा होकर्णेछायाचित्रकारजिल्हा माहिती कार्यालयनांदेडसोशल मीडियापुरस्कार (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)            श्री.आशिष अरविंदचांदोरकरमुख्य उपसंपादकमहाराष्ट्र टाइम्स, (ऑनलाईन) पुणे.
विभागीय स्तरावरील पुरस्कार
दादासाहेब पोतनीस पुरस्कारनाशिक विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्रयापैकी रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) श्रीमती चारुशीला  सुभाषकुलकर्णीवरिष्ठ वार्ताहरदै.लोकसत्तानाशिक;  अनंतराव भालेराव पुरस्कारऔरंगाबादविभाग (लातूरसह) 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्री.हरी रामकृष्ण तुगांवकर,दै.सकाळलातूरआचार्य अत्रे पुरस्कारमुंबई विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्रश्री.संजय कृष्णा बापटविशेष प्रतिनिधीदै.लोकसत्तामुंबईनानासाहेब परूळेकरपुरस्कारपुणे विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्री.योगेश सोपान बोराटे,बातमीदारदै.महाराष्ट्र टाइम्सपुणेशि..परांजपे पुरस्कारकोकण विभाग 41 हजार रुपये(मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्री.दिलीप शांताराम शिंदेदै.सकाळदै.पुढारीठाणे.गो.जाधवपुरस्कारकोल्हापूर विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्रइंदूमती गणेश(सुर्यवंशी), वार्ताहर-उपसंपादकदै.लोकमतकोल्हापूरलोकनायक बापूजी अणे पुरस्कार,अमरावती विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्री.हर्षनंदन सुरेश वाघप्रतिनिधी,दै.लोकमतबुलडाणा.त्र्यं.माडखोलकर पुरस्कारनागपूर विभाग 41 हजार रुपये(मानचिन्ह  प्रशस्तीपत्रश्री.प्रवीण श्रीराम लोणकरदै.महाराष्ट्र टाइम्सनागपूर यांना जाहीर झाले आहेत.
            उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2014 साठी समिती अध्यक्ष म्हणून महासंचालक (माहिती जनसंपर्क)सदस्य सचिव संचालक (माहिती) (वृत्त  जनसंपर्कयांनी तर सदस्य म्हणूनसर्वश्रीचंदन शिरवाळेगजानन निमदेवसंतोष प्रधानअनुराग त्रिपाठीश्रीपाद अपराजितसुरेंद्र गांगणअजिज एजाजदीपक भातुसेश्रीमती मनिषा रेगे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
०००००००