सोमवार, ५ मार्च, २०१२

राज्य शासनाचे 5 कंपन्यांबरोबर पंधराशे कोटींचे सामंजस्य करार


मुंबई, दि. 3 :  राज्य शासनाचे जिंदाल पॉलिफिल्मस्, रुची सोया इंडस्ट्रीज, सोलर इंडस्ट्रीज, इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह आणि अंबुजा सिमेंट या 5 कंपन्यांबरोबर 1500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित झाले.
हॉटेल ताज मध्ये काल सुवर्ण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय रिषद झाली. या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी उद्योग विभागाचे राज्यमंत्री सचीन अहिर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव क्षत्रपती शिवाजी, नियोजन आयोगाचे सदस्य अरूण मैत्र, एमईडीसी चे अध्यक्ष नंदकिशोर  कागलीवाल, महासंचालक रवी बुध्दीराजा, उद्योगपती विठ्ठल कामत, मल्टी नेटचे अध्यक्ष विनोद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.  
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यात औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी आणि जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य शासनाने 2005 मध्ये औद्योगिक विशाल प्रकल्प धोरण जाहीर केले. या धोरणास चांगला प्रतिसाद मिळाला मोठ्या  उद्योगाबरोबरच राज्याने लघू आणि मध्यम उद्योगांच्या विस्तारासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच बरोबर वस्त्रोउद्योग, खाद्य आणि कृषीअधारित उद्योगांसाठी नव्याने धोरण आखण्यात येत आहे. ज्यामध्ये खास करून घू आणि मध्यम उद्योगांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहेराज्य शासनाने दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडॉर हा महत्त्वाचा प्रकल्प  हाती घेतला असून  त्यामुळे  राज्यातील उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते नवी दिल्ली  धुळे अशा दोन ठिकाणांना जोडणारा हा औद्योगिक मार्ग आहे. या प्रकल्पामुळे पुणे, नाशिक या शहरांना फायदा होणार आहे, असेही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले
विशाल प्रकल्प धोरणांतर्गत देशी विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर राज्यात आकर्षित झाली  आहे.  या  धोरणांतर्गत  के. जनरल  मोटर्स,  वोक्स  वॅगन,  डेमलर  क्रायसलर, सॅनी हेवी
                                                                                                                             . . 2
राज्य शासनाचे 5 कंपन्यांबरोबर . . 2

इंडस्ट्रीज, ब्रिज स्टोन, एल.जी.इलेक्ट्रॉनिक्स, मायको बॉश, बोईंग इम्सोफर मॅन्युफॅक्चरिंग हेवी इंडस्ट्रीज, पियाजियो व्हेईकल्स, पोस्को लि. इत्यादी प्रतिष्ठित कंपन्यांची गुंतवणूक राज्यात आकर्षित झाली आहे. या धोरणांतर्गत 77 नवीन विशाल प्रकल्पांना व 11 प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून त्या प्रकल्पात 1 लाख 24 हजार 531 कोटी इतकी गुंतवणूक व 53 हजार 56 व्यक्तींना रोजगाराच्या संधी अपेक्षित आहेत.
मे.जिंदाल पॉलिफिल्मस् लि. या कंपनीबरोबर 450 कोटी रुपयांचा करार करण्यात आला असून 110 व्यक्तींना रोजगाराच्या संधी मिळतील. मे.रुची सोया इंडस्ट्री लि. ही कंपनी वाशिम येथे रोजगार निर्मिती करणार असून कंपनीच्या 143 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 710 व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळतील.             
मे. सोलर इंडस्ट्रीज लि. ही कंपनी 233 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून 750 व्यक्तींना रोजगार मिळेल. मे. इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लि. ही कंपनी 380 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे 800 व्यक्तींना रोजगार मिळू शकेल.  मे.अंबुजा सिमेंट लि. ही कंपनी 305.52 कोटी रुपये गुंतवणूक करणार असून 133 व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
राज्यमंत्री श्री.अहिर म्हणाले की, ग्रामी भागात उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी राज्याने सातत्याने प्रयत्न केला आहे. आयात निर्यातीसाठी राज्यातील रस्ते विकसीत करण्यात राज्याचा पुढाकार आहे. उद्योगांना पायाभू सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा