सोमवार, ५ मार्च, २०१२

केंद्र सरकारच्या विविध क्रीडा पुरस्कारांसाठी 7 मार्चपूर्वी अर्ज करावेत


मुंबई, दि. 3 : केंद्र सरकार तर्फे 2012 या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कारअर्जुन पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पुरस्कारांचे माहिती पत्रक व अर्जांचा विहित नमुना (इंग्रजी) हा संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच विभागीय उपसंचालक कार्यालयात उपलब्ध आहे.
सदरहु अर्ज 7 मार्च, 2012 पूर्वी सादर करावयाचे आहे. तरी इच्छुकांनी अर्जासाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विभागीय उपसंचालक कार्यालय, प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय वसतीगृह, खो.क्र.21/22, बोरीबंदर, मुंबई - 400 001 दुरध्वनी क्र.22073897 येथे संपर्क साधावा,असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, मुंबई विभाग यांनी केले आहे.
-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा