मुंबई, दि. 3 : अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे- पाटील फाऊंडेशनचे इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या संस्थेस
2011-2012 या वर्षाकरिता जी.एन.एम या नर्सिंग अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेश क्षमता 40 वरुन 80 एवढी करण्यास खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाने मान्यता दिली आहे.
अटी व शर्ती
या महाविद्यालयातील जी.एन.एम. या नर्सिंग अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेश क्षमता केंद्रिय परिचर्या परिषदेने निर्धारित केल्यानुसार 80 एवढी राहील. केंद्र सरकार, राज्य
शासन, सर्वोच्च न्यायालय
अथवा उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या
आदेशानुसार प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेली कार्यपध्दत अवलंबिण्यात
यावी.
शासकीय
नियम/ कायदा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या
निर्णयानुसार शैक्षणिक
शुल्कासाठी कार्य पध्दत अनुसरणे भाग आहे.
त्यानुसार शैक्षणिक शुल्क निश्चित करण्यात यावे.
केंद्र
सरकार, केंद्रीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली व राज्य शासन यांनी नर्सिंग
अभ्यासक्रमाबाबत विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे तसेच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध)
अधिनियम 1987
मधील तरतुदींचे
संस्थेने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
या
संस्थेस कायम विना अनुदान तत्वावर मान्यता
देण्यात आली आहे. त्यामुळे संस्था आवर्ती
किंवा अनावर्ती स्वरुपाच्या खर्चासाठी अनुदानाची मागणी शासनाकडे करणार नाही.
शासकीय नर्सिंग तत्सम महाविद्यालयातील कोणत्याही अध्यापकास
तो सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत या
संस्थेमध्ये नोकरी करता येणार नाही. त्यांच्या
सेवा या संस्थेस
वापरता येणार नाहीत.
संस्थेने
कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा
जास्त प्रवेश देऊ नयेत. केंद्र शासनाने दिलेली परवानगी 2011-12 या वर्षासाठी
असल्याने पुढील वर्षाचे प्रवेश करण्यापूर्वी केंद्रीय परिचर्या परिषदेच्या तसेच
त्या आधारे राज्य शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
संस्थेने गुणवत्तेवर आधारित प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या
प्रवेश नियंत्रण समिती, मुंबई
यांच्याकडून मंजूर करुन घेणे व आकारण्यात येणाऱ्या फी शुल्काची निश्चिती शिक्षण
शुल्क समितीकडून करुन घेणे आवश्यक आहे.
0
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा