मुंबई,दि.28: महाराष्ट्र
शासनाने 22 जानेवारी 2002 च्या वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार खुल्या बाजारातून 8.30
टक्के व्याज दराने उभारलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज 2012 ची परतफेड 28 जानेवारी
2012 रोजी करण्यात येणार आहे. कर्जरोखेधारकांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आपली
तारणपत्रे 20 दिवस अगोदर मुखांकित/नोंदणीकृत केलेल्या लोकऋण कार्यालये, कोषागारे,
उपकोषागारे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा/तिच्या सहयोगी बँकांमध्ये सादर करावीत.
कर्जाच्या
रक्कमेत 27 जानेवारी 2012 पर्यंतच्या व्याजाचा समावेश करण्यात आला असून या कर्जावर
28 जानेवारी 2012 पासून व्याज देण्यात येणार नाही. कर्जाच्या परतफेडीच्या
नियततारखेस सार्वजनिक सुट्टी असल्यास कर्जाची परतफेड सुट्टीच्या आदल्या दिवशी
करण्यात येईल. ही तारणपत्रे सादर करताना त्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रातील मूळ
रक्कम मिळाली, असे लिहिणे आवश्यक आहे.
तारणपत्रे
जर संग्रह (स्टॉक सर्टिफिकेट्स)
प्रमाणपत्राच्या स्वरुपात असतील तर अशी प्रमाणपत्रे कोषागार विषयक काम करणाऱ्या
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये किंवा तिच्या संलग्न बँकेत सादर करावीत. अशी
प्रमाणपत्रे कोषागार अथवा उपकोषागार कार्यालयात सादर करु नयेत.
गुंतवणूकदारास तारणपत्राची परतफेड मुखांकित /
नोंदणीकृत ठिकाणापासून अन्यत्र हवी असल्यास ती योग्य कार्यवाहीसह डाक नोंदणी अथवा
विमा टपाल बटवड्याद्वारे सार्वजनिक ऋण कार्यालयाकडे पाठवावीत. सार्वजनिक ऋण
कार्यालय अशा तारणपत्राच्या हुंड्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत किंवा तिच्या संलग्न
बँकेमध्ये पाठवून त्यांच्यामार्फत या तारणपत्रांची रक्कम अदा करण्यात येईल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा