जे.जे.रुग्णालय मुंबईतील महत्त्वाचे व अग्रगण्य शासकीय रुग्णालय असून या रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपलब्ध खाटा आणि सोयीसुविधा यांची मर्यादा लक्षात घेता योग्य उपचार पुरविण्यासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळाने जे. जे. रुग्णालय आवारात 20 मजली रुग्णालय बांधण्यास मान्यता दिली.
या बहुमजली सुपरस्पेशालिटी इमारतीसाठी अंदाजे 376 कोटी रुपये, मुला-मुलींचे वस्तीगृह व अधिकारी कर्मचारी निवासस्थानासाठी 103 कोटी रुपये इतक्या रकमेच्या बांधकामास मान्यता देण्यात आली. त्याच प्रमाणे रुग्णालयासाठी लागणाऱ्या अंदाजे 150 कोटी रुपये इतक्या रक्कमेच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री व ही यंत्रसामुग्री हाताळण्यासाठी लागणा-या कर्मचारी वर्गावर होणा-या अंदाजे प्रतिवर्ष 19 कोटी रुपये इतक्या वाढीव आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. रुग्णालये इमारतीसाठी 5.32 इतके चटईक्षेत्र अनुज्ञेय करणे व 30 मिटर पेक्षा जास्त उंचीचे रुग्णालय बांधकामास मनाई असलेली अट शिथील करण्याबाबत नगर विकास विभागाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी या बाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेची आवश्यकता नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा