मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर


मुंबई, दि. 2 : स्त्री शिक्षणाची प्रथम सुरुवात करणाऱ्या थोर समाजसुधारक कै. सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी या जन्मदिनी प्रत्येक शैक्षणिक विभागातून एक याप्रमाणे आठ महिला शिक्षिकांना `आदर्श शिक्षिका पुरस्कार` दरवर्षी जाहीर केला जातो. यंदाचा `आदर्श शिक्षिका पुरस्कार` आज जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी 5 सप्टेंबर या `शिक्षक दिनी` खास समारंभात केले जाते. सदर पुरस्काराची रक्कम रु. 10,000/- इतकी आहे.
            महिला व मुलींच्या शिक्षणासाठी  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  राज्यातील आठ शिक्षिकांची  नावे या पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली आहेत .
            मुंबई विभाग ; इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यालय, हिंदु  कॅलनी, दादर (पूर्व)  पर्यवेक्षिका, नाबर माया अशोक, पुणे विभाग ; एस. एन. डी. टी. कन्या शाळा 591 नारायण पेठ पुणे, सहाय्यक शिक्षिका डॉ. जोशी स्नेहा विनायक,  नाशिक विभाग ; मा. अ. व. च. चांडक कन्या विद्यालय, सिन्नर ता. सिन्नर, जि, नाशिक, मुख्याध्यापिका, डॉ. टोकेकर स्वाती  राजेंद्र, कोल्हापूर विभाग ; कोटेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, गोवे, ता. जि. सातारा,  सहाय्यक शिक्षिका, श्रीमती साबळे विभा विजय,   
            औरंगाबाद विभाग ;  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाबरगाव ता. गंगापूर, जि, औरंगाबाद. मुख्याध्यापिका, भवर संगीता वामनराव, लातूर विभाग ; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाराणा प्रताप नगर केंद्र कासारखेडा ता. जि. लातूर, मुख्याध्यापिका, पवार गंगाबाई संदिपान, अमरावती विभाग ; महिला महाविद्यालय अमरावती, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षिका, इथापे सुनीता राम, नागपूर विभाग ;  जिल्हा परिषद  वरिष्ठ प्राथमिक शाळा, ब्राम्हणी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया, पदवीधर प्राथमिक शिक्षिका, पठाण नूरजहॉ हबीबभाई यांची आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा