मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

स्व.यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार


संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेत अतिशय मोलाची भूमिका बजावलेल्या तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले परिश्रम लक्षात घेता महाराष्ट्राचे नावलौकिक वाढविणाऱ्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला
यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरुप केवळ उत्सवी रहाता जनतेच्या स्मृतीत राहतील असे विधायक उपक्रम शासनातर्फे हाती घेण्यात येतील. तसेच लोकांनाही यात सहभागी करून घेण्यात येईल
यातील काही महत्त्वाचे उपक्रम पुढीलप्रमाणे :-
दिनांक 13 मार्च,2012 ते 12 मार्च,2013 हे वर्ष  " जन्मशताब्दी वर्ष " म्हणून साजरे करण्यात येईल. प्रस्तावित कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल. यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामस्थ ही नवीन स्पर्धा आयोजित करण्यात येईल.
           कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मारक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. लोकराज्यचा विशेषांक प्रसिध्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे सह्याद्रीचे वारे हे यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणाचे पुस्तक पुन:मुद्रीत करण्यात येईल. जीवन चरित्रावर आधारित मालिका तयार करून दूरदर्शन आकाशवाणीवरुन प्रसारित करण्यात येईल. विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
----00----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा