मुंबई, दि. 2 : राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील
शासकीय वसतीगृहांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मासिक निर्वाह भत्त्यात
सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार
तालुका स्तरावरील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये, जिल्हास्तरावर 600
रुपये तर विभागीय स्तरावर 800 रुपयांपर्यंत
निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील 466 शासकीय
वसतीगृहांतून सुमारे 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1985 च्या शासन निर्णयानुसार वसतीगृह योजनेसाठी
लागू असलेल्या सुविधांमध्ये वाढत्या महागाई नुसार बदल करणे अत्यावश्यक असल्यामुळे हा
निर्णय घेण्यात आला आहे.
निर्वाह भत्त्याबरोबरच वसतीगृहातील इतरही सोयी-सुविधांमध्ये आमूलाग्र
बदल करण्यात आले असून आदिवासी विद्यार्थ्यांना आता ई- लायब्ररी, संगणक, ग्रंथालय,
इंटरनेट, स्पर्धापरीक्षेची मासिके, क्रीडा साहित्य व शैक्षणिक संशोधनात्मक पेड
चॅनलकरिता डिश अँटीना, कलर टी.व्ही , ॲक्वागार्ड वॉटर फिल्टर, वॉटर कुलर याबरोबरच
सोलर उर्जेवरील सोलर स्ट्रीट लाईट व सोलर वॉटर हिटर इत्यादी साधनांच्या सुविधांसह
इतरही अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सर्व सोयीसुविधा आदिवासी वसतीगृहातील
विद्यार्थ्यांना निश्चितच लाभदायक ठरतील.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा