गुरुवार, ३० जुलै, २०१५

जनरल मोटर्स सोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार एकूण 6 हजार 400 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक

  मुंबई, दि. 30: जनरल मोटर्स व महाराष्ट्र शासन यांच्यात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.
          या करारानुसार  जनरल मोटर्स ही अमेरिकन कंपनी महाराष्ट्रात एकूण 6400 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे.  कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेरी बॅरा यांनी याबाबत भारत आणि सिंगापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री यांची भेट घेतली.  यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
          जगातील वाहन उत्पादनात आघाडीवर असलेल्या जनरल मोटर्स कंपनीने महाराष्ट्रात अधिकाधिक वाहनांची निर्यात करता यावी यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगांव येथील प्रकल्पाचा  विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार 6400 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.
          जनरल मोटर्स या कंपनीने महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या कंपनीची तळेगाव येथील वाहननिर्मितीची क्षमता 1,70,000 युनीटस इतकी आहे. या प्रकल्पाच्या क्षमता वाढीसाठी 4.3 बिलीयन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक कारच्या वेगवेगळ्या मॉडेल, जसे बिट, सेल आणि स्पार्क करणार आहेत. देशांतर्गत वाहनांची पूर्तता केल्यानंतर 2014 साली चिली या देशाला पहिली निर्यात सुरु केली. या प्रकल्पासाठी तीनशे एकर जागा महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाकडून 95 वर्षाच्या कराराने देण्यात आलेली असून 1000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
          याशिवाय जवळपास 200 मिलीयन डॉलर्सची गुंतवणूक 1,60,000 युनीटची शक्तीशाली इंजीन बनविण्यासाठी केलेली आहे. ही क्षमता 3,00,000 युनीटस् इंजिन इतकी वाढू शकते आणि त्यामुळे 1400 अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
          ग्राहकांना मागणी व सेवा पुरविण्यासाठी कंपनीने देशात 275 सेवा केंद्रे व 269 विक्री केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 33 सेवा केंद्रे व 29 विक्री केंद्रे स्थापन केलेली आहेत व त्यांचे प्रमाण 11 व 12 टक्के इतके आहे.
          जनरल मोटर्सची सद्य:स्थितीची गुंतवणूक व महाराष्ट्रातील मर्सिडीज, फोक्सवॅगन, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, स्कोडा इ. यांचा एकत्रित विचार करता महाराष्ट्र वाहन निर्मिती क्षेत्रात भक्कम स्थितीत आहे. महाराष्ट्र भारतातले वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य राज्य आहे. राज्य सरकारने वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांसह विस्तार करण्यासाठी आगाऊ चर्चा व प्रयत्न सुरू केलेले आहेत.
          मुख्यमंत्र्याच्या अमेरिका दौऱ्यात क्राईसलर यांच्याशी सुध्दा नव्याने ग्रॅण्ड चेरॉकी या वाहनाचे उत्पादन करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
          या सामंजस्य करारानंतर मुख्यमंत्र्यांनी  विधानसभेत निवेदन केले. यावेळी  विधानसभेच्या गॅलरीमध्ये जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेरी बॅरा या उपस्थित होत्या. त्यांचेही स्वागत मुख्यमंत्र्यांनी योवळी केले.
000

नाविन्यपूर्ण योजनेसाठी योग्य लाभार्थ्यांची निवड करावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ




         धुळे, दि. 30 :- पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत द्यावयाच्या लाभार्थ्यांची योग्य निकषाच्या आधारे  निवड करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिल्या.
            पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना 2015-16 च्या जिल्हास्तरीय लाभार्थ्यांच्या निवडीची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच. एम. खलाणेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. यु. डी. पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनांची सखोल माहिती देण्याकरिता कार्यशाळा आयोजित करून  योग्य लाभार्थ्यांची निवड करण्याबाबतची माहिती  देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यात नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 6 संकरित गायी/म्हैस गट, अंशत: ठाणबंद पध्दतीने शेळी पालन (10 शेळ्या व एक बोकड),  एक हजार मांसल कुक्कुट पालन योजनांचा लक्ष्यांक वितरीत केला. लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर योग्य पध्दतीने पशुधनाच्या संगोपनाची पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
          लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप
           यावेळी पशुसंवर्धन खात्याचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना कृत्रिम रेतनापासून जन्मलेल्या संकरित कालवडी/पारडयांच्या संगोपनासाठी प्रोत्साहन रक्कमेच्या 5 हजार रूपये धनादेश प्रत्येकी विखरण ता. शिरपूर येथील रोहीत सुदाम पाटील आणि वरखेडा (कुसुंबा) ता. धुळे येथील वामनराव लहू मराठे यांना प्रातिनिधीक स्वरूपात वितरीत करण्यात आले.

000000

नाविन्यपूर्ण योजनेसाठी योग्य लाभार्थ्यांची निवड करावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ



धुळे, दि. 30 :- पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत द्यावयाच्या लाभार्थ्यांची योग्य निकषाच्या आधारे  निवड करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिल्या.
            पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना 2015-16 च्या जिल्हास्तरीय लाभार्थ्यांच्या निवडीची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच. एम. खलाणेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. यु. डी. पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनांची सखोल माहिती देण्याकरिता कार्यशाळा आयोजित करून  योग्य लाभार्थ्यांची निवड करण्याबाबतची माहिती  देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यात नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 6 संकरित गायी/म्हैस गट, अंशत: ठाणबंद पध्दतीने शेळी पालन (10 शेळ्या व एक बोकड),  एक हजार मांसल कुक्कुट पालन योजनांचा लक्ष्यांक वितरीत केला. लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर योग्य पध्दतीने पशुधनाच्या संगोपनाची पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप
            यावेळी पशुसंवर्धन खात्याचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना कृत्रिम रेतनापासून जन्मलेल्या संकरित कालवडी/पारडयांच्या संगोपनासाठी प्रोत्साहन रक्कमेच्या 5 हजार रूपये धनादेश प्रत्येकी विखरण ता. शिरपूर येथील रोहीत सुदाम पाटील आणि वरखेडा (कुसुंबा) ता. धुळे येथील वामनराव लहू मराठे यांना प्रातिनिधीक स्वरूपात वितरीत करण्यात आले.

000000

नागरिकांना जास्ती-जास्त आरोग्य सुविधा द्या जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 29 :- जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
            राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियामक मंडळाची सभा आणि जिल्हास्तरीय सुकाणु समितीची सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली.  त्यावेळी  ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वानखेडे,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. आर. पवार,   डॉ. जे. एम. बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील (धुळे), डॉ. ए. एच. लोया (शिरपूर),      डॉ. व्ही. एस. वानखेडे (साक्री), शिरपूर उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. ध्रुव वाघ,  जिल्हा प्रकल्प अधिकारी     (नगर पालिका प्रशासन) श्रीमती शिरसाठ, प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे ए. ए. देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती ए. के. आठवले, लेखा व्यवस्थापक यु. बी. देशपांडे  आदी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, रूग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये, जिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात.
            या सभेत राष्ट्रीय अभियान अंतर्गत आरसीएच, एनएचएम पार्ट बी, नियमित लसीकरण, तालुका निहाय जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, बाल आरोग्य, किशोर स्वास्थ कार्यक्रम, फॉलीक ॲसीड औषधे वाटप, आशा योजना, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम, रूग्ण कल्याण समिती आदी  योजनांचा आढावा घेतला.  तसेच अतिसार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 27 जुलै ते 8 ऑगस्ट, 2015 पंधरवाडा आयोजित करण्याबाबतची माहिती यावेळी  दिली.  या उपक्रमांतर्गत झींग व ओआरएस या औषधांचे वाटप जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचेही यावेळी  सांगितले.

0000000

शासकीय लोकसेवकाने भ्रष्टाचाराने मिळविलेली संपत्ती जप्त करण्यासाठी राज्य शासन कायदा करणार - मुख्यमंत्री

शासकीय लोकसेवकाने भ्रष्टाचार करून मिळविलेली संपत्ती जप्त करण्यासाठी राज्य शासन कायदा करीत असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मांडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य प्रकाश बिनसाळे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी शासन निर्णय पारीत करण्यात आला असून स्थानिक स्तरापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना संपत्तीबाबत खुलासा कराला लागणार आहे. यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
शासकीय लोकसेवकाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असताना त्यात अपसंपदा निष्पन्न झाल्यास ती जप्त करण्यासाठीचा कायदा राज्य शासन तयार करणार आहे. सध्या या कायद्याचे प्रारूप तयार केले असून डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात ते मांडण्यात येईल, यासंदर्भात विधीमंडळाच्या सदस्यांच्या सुचना देखील विचारात घेतल्या जातील, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने सेवा हमी विधेयक आणल्यामुळे अधिकाऱ्यांवर विहीत कालमर्यादेत काम करण्याची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे सामान्यांना शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागणार नाहीत. प्रशासनात पारदर्शकता आणतानाच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उपायांची आणि सुधारणांची साखळी निर्माण करावी लागणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
०००

मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाले सादरीकरण गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आता 'स्मार्ट ग्राम योजना' ग्रामविकासाची चळवळ गतिमान करणार

मुंबई, दि. २९ राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आता राज्यातील ग्रामपंचायती सुप्रशासन आणि मूलभूत सुविधांनी युक्त, विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या, अपारंपरिक ऊर्जा, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य अशा विविध सुविधांनी युक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामविकास विभागामार्फत स्मार्ट ग्राम योजनेची आखणी करण्यात येत असून यासाठी आज श्रीमती पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ग्रामविकास विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट ग्राम योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींना सक्षम आणि स्मार्ट बनवून ग्रामविकासाच्या चळवळीला गतिमान केले जाईल, असे यावेळी श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
सादरीकरणावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत गावांच्या विकासासाठी सध्या विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागांकडूनही ग्रामविकास विषयक विविध योजनांची अंमलबजावणी होते. अशा विविध योजनांचे एकत्रिकरण करुन तसेच शासनाच्या विविध विभागांचा समन्वय साधून स्मार्ट ग्राम योजना राबविली जाईल. यासाठी शासनामार्फत पुरेशा निधीची तरतूदही केली जाईल. शिवाय या योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना पुरस्कृतही केले जाईल, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
स्मार्ट ग्राम योजनेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचे सक्षमीकरण, विविध विकास योजनांची अंमलबजावणी, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, डिजिटायजेशन, ग्रामपंचायतीचे संगणकीकरण, अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर, पर्यावरण रक्षण, वनीकरण, स्वच्छता, जलसंधारण, कुपोषणमुक्ती, आरोग्य अशा विविध घटकांच्या संपूर्ण अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जाईल. या सर्व मूलभूत सुविधांनी युक्त, आरोग्याने परिपूर्ण अशी गावे निर्माण करण्याचा आपला मानस असून यासाठी राज्यात स्मार्ट ग्राम योजना प्रभावी पद्धतीने राबविली जाईल, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील ग्रामपंचायतींचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला असून ग्रामपंचायतींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, निमशहरी ग्रामपंचायती, ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या किंवा आदिवासीबहुल ग्रामपंचायती आणि सर्वसामान्य ग्रामपंचायती असे वर्गीकरण करुन त्या अनुषंगाने ग्रामपंचायती स्मार्ट बनविल्या जातील. तसेच राज्याच्या विविध भागाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करुन त्यानुसार त्या त्या भागात वेगवेगळ्या निकषांनुसार स्मार्ट ग्रामची चळवळ राबविली जाईल, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
०००००००००

महाराष्ट्र राजभाषा विधेयक विधानसभेत संमत

मुंबईदिनांक 29 महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मधील कलम १ मध्ये मराठी भाषेचा 'राजभाषाअसा सुस्पष्ट उल्लेख नसल्यामुळे या अधिनियमात सुधारणा करणारे महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम २०१५ हे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले आणि हे विधेयक विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज हे विधेयक मांडले.

            कर्नाटकतामिळनाडूकेरळ आदी राज्यांच्या राजभाषा नियमांमध्ये त्या त्या राज्यांच्या राजभाषांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो.  मात्र तसा स्पष्ट उल्लेख महाराष्ट्र राजभाषा अधिनियमामध्ये आजपर्यंत केलेला नव्हता. त्यामुळे या विधेयकात सुधारणा करुन महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असेल असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.
००००

3 ऑगस्ट रोजीचा मंत्रालय लोकशाही दिन व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे होणार

मुंबई, दि. 29: मंत्रालय लोकशाही दिन सोमवार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती कक्ष, 6 वा मजलामंत्रालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनात मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे तक्रारदारांशी संवाद साधणार आहेत.
 संबंधित अर्जदाराने आपली तक्रार मुख्यमंत्र्यांना विशद करण्यासाठी अर्जदाराने आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिगदालनात 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांनी याबाबत प्राप्त अर्जांनुसार अर्जदारांना उपस्थित राहण्याबाबत दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या आहेत. अशा अर्जदारांना दालनात प्रवेश दिला जाणार आहे.
 ज्या अर्जदाराने अर्जाच्या, प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत  त्यासहआवश्यक कागदपत्राच्या प्रती जोडल्या असतील व अर्ज स्वकृतीबाबतज्यांना कळविण्यात आलेले आहे, अशाच अर्जदाराना या लोकशाही दिनामध्येनिवेदन करण्यासाठी प्रवेश देण्यात येईलअसे सामान्य प्रशासन विभागानेकळविले आहे.
0000

बुधवार, २९ जुलै, २०१५

जिल्हा परिविक्षा समिती सभा संपन्न

धुळे, दि. 29 :- जिल्हा परिविक्षा समितीची प्रथम सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल  सोनवणे, महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले, आयटीआयचे प्राचार्य अजय पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे, समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य जालिंधर आडसुळे, कारागृह अधीक्षक  बी. आर. मोरे, प्र. जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती एस. डी. परदेशी, परिविक्षा अधिकारी श्रीमती ए. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ  म्हणाले की, अपराधी परिविक्षा अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांनी कार्यवाही करून यापुढील सभेत प्रकरणांची माहिती द्यावी, असेही त्यांनी  सांगितले.
            यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  बी. एच. नागरगोजे यांनी समिती सदस्यांची माहिती, अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 बाबतची माहिती, अपराधी परिविक्षा नियम 1966 मधील नियम 32 मधील तरतुदी, परिविक्षा अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आदींची माहिती दिली.
अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 व नियम 1966 ची प्रभावी अंमलबजावणी  होण्यासाठी    महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 27 एप्रिल, 2015 नुसार जिल्हा परिविक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हादंडाधिकारी हे आहेत.  तर समितीचे सदस्य म्हणून पोलीस अधीक्षक, जिल्हा सत्र न्यायाधीश यांचे प्रतिनिधी, कारागृह अधीक्षक, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे व्यवस्थापक, महिला समुपदेशन केंद्राचे प्रतिनिधी हे असून सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तर सह सदस्य सचिव हे जिल्हा परिविक्षा अधिकारी आहेत.



पुनर्वसित गावात अपूर्ण नागरी सुविधांची कामे त्वरित कार्यान्वित कराव्यात -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 29 :- पुनर्वसित गावातील अपूर्ण नागरी सुविधांची कामे  त्वरित पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधितांना दिल्या.  
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाच्या पुनर्वसन व अडीअडचणी बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती शुभांगी भारदे, साक्री पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वाय. डी. शिंदे, धुळे मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता  भदाणे, अक्कलपाडा प्रकल्प विभागाचे सहाय्यक अभियंता पी. जी. पाटील, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभागाचे उप अभियंता के. सी. कुवर, वाडी-शेवाडी ता. शिंदखेडा प्रकल्प उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 आर. पी. गरूड,  साक्री नायब तहसिलदार व्ही. डी. ठाकूर, पुनर्वसन तालुका समितीचे अध्यक्ष सुभाष काकुस्ते, तामसवाडीचे सरपंच मधुकर अहिरे आदी उपस्थित होते.
             जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्यानंतर प्रकल्प यंत्रणेने योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्याव्यात.   तसेच वाढीव वस्तीमध्ये पुरक पाणी पुरवठा योजना करण्यासाठी ग्रामपंचायतीने कृती आराखडयात या योजनांचा समावेश करावा, असेही सांगितले. 
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या विविध निवाडयातील कलम 18 व कलम 28 अ अंतर्गत मागणी मोठया कालावधीपासून प्रलंबित आहे.  याबाबत जून व जुलै-2015 मध्ये   14 कोटी 55 लाख रूपये न्यायालयात जमा  करण्यात आलेली असून उर्वरित रक्कमा तातडीने प्राप्त होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी  मिळण्यासाठी संबंधितांनी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.
            सैय्यदनगर या पुनर्वसित गावठाणात स्थलांतरीत करणे हे उद्दिष्ट निश्चित करून  जिल्हा परिषद, धुळे पाटबंधारे विभाग, पुनर्वसन विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या सर्व यंत्रणांनी  समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
            ते पुढे म्हणाले की, तामसवाडी, वसमार, सैय्यदनगर या गावातील वैयक्तिक शौचालयांच्या बाबतीत त्वरित निर्णय घ्यावा व पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.  पूर्ण होणाऱ्या नागरी सुविधा ग्राम पंचायतीने ताब्यात घेऊन पुढील विकास कामे जिल्हा परिषदेमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीमधून करण्यात यावी,असेही त्यांनी सांगितले.

000000

शनिवार, २५ जुलै, २०१५

जवाहर नवोदय विद्यालयाच्या नूतन इमारतीची जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून पाहणी




धुळे, दि. 25 :- गेल्या शुक्रवारी गोंदूर-नकाणे रोड वरील  30 एकर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीत यापूर्वी मेहेरगाव येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे   स्थलांतर करण्यात आलेले आहे.  नूतन इमारतीत उपलब्ध सोयी-सुविधा आणि त्रुटींची पूर्तता कशी करता येईल हे जाणून घेण्याकरिता जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज प्रत्यक्ष जाऊन नूतन इमारतीची व परिसराची पाहणी केली.  त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, शासकीय तंत्र निकेतन स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के. आर. पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता व्ही. के. सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. एस. सानप, सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाचे शाखा अभियंता एन. डी. इंगळे, महानगरपालिका शाखा अभियंता बी. डी. जगदाळे, पी. डी. चौधरी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता ए. बी. मोरे, शाखा अभियंता एन. डी. चौधरी,  जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. बोरसे आणि शाखा अभियंता पंकज शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी 30 एकर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात प्रामुख्याने ग्रंथालय, वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, भोजन कक्ष, स्वयंपाक गृह, अधिकारी, कर्मचारी यांची निवासस्थाने त्याचबरोबर पाणी पुरवठा करता बांधण्यात आलेले जलकुंभ, परिसरातील पथदिवे आदी बाबींची बारकाईने पाहणी केली.  या  पाहणी दरम्यान त्यांना आढळून आलेल्या त्रुटींबाबत विद्यालयाच्या विभागीय कार्यालय पुणे येथील अभियंता पंकज शर्मा यांना  नोंदी घेऊन त्याबाबतचा अहवाल जिल्हा समितीपुढे सादर करण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची निवासव्यवस्था आणि त्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा योग्य पध्दतीने पुरविण्याबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्राचार्य आणि शिक्षक वृंदांना दिल्या.
प्रारंभी प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी मान्यवरांचे स्वागत करून जवाहर नवोदय विद्यालयाच्या नव्या परिसरात असलेल्या त्रुटींची माहिती सादर केली. 
000000


शेतकऱ्यांना उर्वरित पीक कर्जाचे वाटप बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

         धुळे, दि. 25 :- जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात  पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे चांगले काम केले  आहे असा उल्लेख करून  जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे वाटप दि. 30 जून अखेर उद्दिष्टाच्या 54 टक्के  झाले आहे.  शेतकऱ्यांना उर्वरित पीक कर्जाचे वाटप  बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सन 2015-16 या कालावधीतील पीक कर्ज वाटपाबाबत बँका आणि कृषि विभागाची  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उप विभागीय कृषि अधिकारी पी. एम. सोनवणे,  जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे,  नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे,  बँक ऑफ  महाराष्ट्रचे विनय जावळे,  अलाहाबाद बँकेचे बी. प्रसाद, सिंडीकेट बँकेचे सी. एन. पावरा,   महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय गुरव, जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी आर. बी. वीरकर,  कॅनरा बँकेचे गुप्ता, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अशोक देसले, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दत्तात्रय धनराळे, युको बँकेचे सहाय्यक प्रबंधक गोपाल प्रसाद, राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, सन 2014 मध्ये पीक कर्जाच्या नुकसान भरपाईची रक्कम पीक विमा कंपनीकडून  बँकांना वर्ग करण्यात आलेली आहे. परंतु बँकांकडे अद्याप रक्कम वर्ग झालेली नाही अशी माहिती बैठकीत देण्यात आली असून याबाबत संबंधित बँकांनी  शहानिशा करावी, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शासनाच्या पीक विमा योजनेबाबत सर्व बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना माहिती देऊन जास्ती-जास्त शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  जेणेकरून नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल. त्यासाठी  पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

दहिवद येथे 29 जुलै रोजी ‘रोजगार मेळावा’

        धुळे, दि. 24 :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे व रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि., दिसान कोटेक्स प्रा. लि. दहिवद ता. शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार   दि. 29 जुलै, 2015 रोजी सकाळी 11-00 वाजता ‍ शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. येथे इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण असलेल्या  उमेदवारांच्या रोजगार सहाय्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या रोजगार मेळाव्याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
             या मेळाव्यासाठी रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. व दिसान कोटेक्स प्रा. लि. दहिवद येथील उद्योजक मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची जागेवरच निवड करणार आहेत.  त्‍यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या किमान एस.एस.सी., एच.एस.सी. उत्तीर्ण व 18 ते 35 वर्षे या वयोमर्यादेतील ज्या उमेदवारांची खाजगी क्षेत्रातील उद्योजकांकडे काम करण्याची तयारी आहे, त्यांनी उपस्थित रहावे.  सोबत येतांना शैक्षणिक प्रमाणपत्र,  बायोडाटा यासह स्व:खर्चाने उपस्थित रहावे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

000000000

जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते तंबाखू मुक्त शाळा आणि परिसर भित्तीपत्रकाचे विमोचन

        धुळे, दि. 24 :- येथील समर्थ कॅन्सर फाऊन्डेशन तर्फे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते तंबाखू मुक्त शाळा आणि परिसर या उपक्रमांतर्गत भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, बीआरजीएफ योजनेचे समन्वयक अशोक पाटील, फाऊन्डेशनचे मुख्य विश्वस्त डॉ. तुषार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
         जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, उपचार करण्यापेक्षा उपाययोजना राबविणे महत्वाचे असते.  तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शारिरीक हानी  होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर रहावे, असे यावेळी सांगितले.
        डॉ. तुषार पाटील म्हणाले की, शहरातील समर्थ कॅन्सर फाऊन्डेशन अनेक वर्षांपासून कॅन्सर मुक्ततेसाठी विशेष प्रयत्न करीत आहे.  शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही वर्षात तंबाखूजन्य पदार्थांचे आकर्षण वाढत आहे.  त्यामुळे सहाजिकच कॅन्सरग्रस्त रूग्णांची संख्या वाढत चालली  आहे.  त्यासाठी तंबाखूमुक्त शाळा आणि महाविद्यालय हा उपक्रम घेऊन जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.  या उपक्रमांतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दर्शविणारे भित्तीपत्रक तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

0000000

रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीची चिन्हे व गतिरोधके बसवा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 24 :- जिल्ह्यात रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित  ठेवणे आवश्यक आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर, शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची चिन्हे, वेग मर्यादा फलक आवश्यक तेथे गतिरोधके संबंधित यंत्रणांनी 15 दिवसाच्या आंत बसवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिल्या.
            गतिरोधक समिती व रस्ता सुरक्षा उपाययोजना समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, महानगरपालिका उपआयुक्त     डॉ. प्रदीप पठारे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. भदाणे, उप अभियंता एस.डी. सूर्यवंशी,  राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 चे  प्रकल्प संचालक  एम. के. वाठोरे,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  एन. आर. जगदाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सी. डी. थवील, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक  अशोक देवरे आदि उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, गतिरोधक समिती व रस्ता सुरक्षा करावयाच्या उपाय योजना समितीच्या दि. 10 मार्च, 2015 रोजी झालेल्या सभेतील विषयानुसार  राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर, सुरत-धुळे रस्ता, पारोळा रोड, शिवाजी पुतळा चौक,  धुळे मनपा हद्दीतील जिल्हा न्यायालय समोरील स्टेशनरोड, चाळीसगाव रोड, 80 फुटीरोड चौफुली आदि रस्त्यांवर गतिरोधके बसविण्याची, वाहतुकीची चिन्हे, वेगमर्यादा फलक लावण्याची कार्यवाही करावी.  जेणेकरून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल.  त्यामुळे वाहन चालकांना वाहनांचा वेग नियंत्रीत करणे सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
            उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची, पार्कींग लॉटस करण्यासाठी समितीच्या अहवालाची माहिती  यावेळी दिली.
0000000


शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हॉकर्स, पार्कींग, वाहतूक सिग्नल व्यवस्थेसाठी समन्वय साधावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 24 :- शहरात रस्त्यावरील वाहतूक  सुरक्षित ठेवणे  आवश्यक आहे.  शहरातील  वाहतुकीची कोंडी होणार नाही याकरिता पोलीस, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांनी  हॉकर्स, सार्वजनिक पार्कींग तसेच वाहतूक सिग्नल आदींची व्यवस्था समन्वयाने करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात धुळे शहरातील वाहतूक समस्या बाबतची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे(धुळे) राहूल पाटील (शिरपूर), महानगरपालिका उपआयुक्त  डॉ. प्रदीप पठारे, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. भदाणे, नगररचनाकार एस. बी. विसपुते, उप अभियंता एस.डी. सूर्यवंशी,  राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 चे  प्रकल्प संचालक  एम.के. वाठोरे,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  एन. आर. जगदाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सी. डी. थवील, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक  अशोक देवरे आदि उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, महानगरपालिकेने स्थानिक हॉकर्सच्या मागणीनुसार शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेच्या असलेल्या जागांवर त्यांची पर्यायी व्यवस्था  करून द्यावी. त्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल, असेही त्यांनी सांगितले.
            शहरातील  सार्वजनिक पार्कींग व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, शहरातील महानगरपालिका शाळा क्र. 1, देवपूर, साक्रीरोड, भारतीय स्टेट बँक  अशा भागात दुचाकी, चार चाकी वाहनांकरिता स्वतंत्र पार्कींग व्यवस्था करून त्याठिकाणी त्याबाबतचे फलक लावण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करावी.  त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.  वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होणार नाही अशी अतिक्रमणे काढावीत.  शहरातील सावरकर पुतळयाजवळ असलेल्या फर्निचर दुकानदारांनी रस्त्यावर वस्तु ठेऊ नये, ठेवल्यास त्या वस्तु जप्त करण्याची कारवाई संबंधितांनी करावी. तसेच जाहिरात फलकांचा कायम आणि तात्पुरत्या स्वरूपाचा आराखडा महानगरपालिकेने त्वरित करावा.
            पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील म्हणाले की, शहरातील आग्रा रोड, संतोषी माता चौक तसेच जास्त वर्दळीच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजुला पांढरे पट्टे टाकावेत.  त्यामुळे संबंधित परिसरातील दुकानदार आपल्या वस्तुंचे प्रदर्शन रस्त्यावर करणार नाहीत.  तसेच शहरातील एस. टी. बसेस थांब्याच्या डाव्या बाजुस थांबवून प्रवाशांची वाहतूक करणे आवश्यक आहे.  त्यासाठी एस. टी. महामंडळाकडून बसचालकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.  जेणेकरून  रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहील, असेही त्यांनी सांगितले.
000000


गुरुवार, २३ जुलै, २०१५

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करणार -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 23 :- धुळे शहरात लेनिन चौकाजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून या स्मारकाच्या प्रस्तावित जागेसाठी महानगरपालिकेने ठराव केला असून 180 चौरस मिटर जागेत हे स्मारक उभारण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ शासनास मान्यतेसाठी सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  दिली.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपवनसंरक्षक डी. यु. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, महानगरपालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगररचनाकार एस. बी. विसपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता सी. के. वाणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष वाल्मिक दामोदर, सचिव राजेंद्र सोनवणे, सदस्य साहेबराव भामरे, बलराज मगर,  सुभाष जाधव, वाल्मिक जाधव, संजय मरसाळे, बंडुनाना गांगुर्डे, हरिश्चंद्र लोंढे, महेंद्र चांदणे, गुलाम कुरेशी आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, वन विभाग व पोलीस अधीक्षक यांनी सिटी सर्व्हे क्रमांक 3521 मधील 180 चौरस मिटर जागेत पुतळा उभारण्यास ना हरकतदिली असून सर्व संमतीने निश्चित करण्यात आलेल्या पुतळयाचे रेखांकन सौंदर्य शास्त्रदृष्टया जास्ती-जास्त आकर्षक बनविण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000000

बुधवार, २२ जुलै, २०१५

मजूर कुटुंबातील एका व्यक्तीला कौशल्यवृध्दीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार

             धुळे, दि. 22 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत  कौशल्यवृध्दीसाठी प्रशिक्षण, कुशल मजुरीसाठी कौशल्यवृध्दी व स्वयंरोजगारासाठी कौशल्यवृध्दी या माध्यमातून मजूर वर्गास त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सर्वेक्षण प्रक्रिया राबविण्यात येत असून, सर्व ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्थांना या सर्वेक्षणादरम्यान सहभागी होण्याचे व कुटुंबातील एका सदस्याच्या प्रशिक्षणासाठी नाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
 या उपक्रमाचा फायदा जिल्ह्यातील 3,583 कुटुंबांना होणार असून जिल्ह्यातील धुळे तालुका-1,645 कुटुंबे, साक्री-1,323 कुटुंबे, शिंदखेडा-462 कुटुंबे, शिरपूर 153 कुटुंबे अशा 3,583 कुटुंबातील एका सदस्यास त्यांच्या इच्छेनुसार विविध स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची कौशल्यवृध्दी व्हावी व ते स्वत:चा व्यवसाय करून स्वयंपूर्णत: स्वत:ची उपजिविका चालविण्यास्तव सक्षम व्हावे या दृष्टीकोनातून केंद्र शासनाने Project Life MGNREGA हा उपक्रम हाती घेतलेला आहे.  या उपक्रमाची अंमलबजावणी मग्रारोहयो यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( MSRLM ) यांच्याद्वारे संयुक्तरित्या करण्यात येणार आहे.  या उपक्रमांतर्गत ज्या कुटुंबाने आर्थिक वर्ष 14-15 मध्ये 100 दिवस योजनेवर मजूर म्हणून काम केले आहे अशा कुटुंबातील एका व्यक्तीला कौशल्यवृध्दीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  हे प्रशिक्षण केंद्र शासनाच्या DOU-GKY (दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना) तसेच RSETI  या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.  Project Life अंतर्गत 100 दिवस काम केलेले आहे.  त्या कुटुंबातील 18 ते 35 या वयोगटातील युवक तसेच महिला, अतिविशिष्ट आदिवासी समुह आणि Trandgender प्रवर्गातील मजुरांसाठी वयोमर्यादेची अट 18 ते 45 या वयोगटातील आहे.

00000

आषाढी एकादशीसाठी वाहतूक नियमन

            धुळे, दि. 22 :- धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. 27 जुलै, 2015 रोजी विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरत असते.  यात्रेत मोठ्या प्रमाणावर महिला व पुरूष भाविक येत असल्याने दि. 27 जुलै रोजी पहाटे 5-00 वाजेपासून ते रात्री 11-00 वाजेपावेतो अग्रसेन महाराज पुतळा 80 फुटी रोड ते दसेरा मैदान पावेतोचा रस्ता  वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
 रस्त्याच्या दोन्ही बाजूस कटलरी, नारळ विक्री, फुल विक्री व इतर स्टॉल लागलेले असतात.  त्यात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते, असेही पत्रकात नमूद केले आहे.

000000

ध्वनी प्रदूषण नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

            धुळे, दि. 22 :- उच्च न्यायालयातील डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या जनहित याचिका क्रमांक १७३/ २०१० या याचिकेवरील सुनावणीत २४ जून, २०१५ रोजी ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका यांनी तसेच पोलीस प्रशासनाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत.
               आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवले आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, नागरी क्षेत्र वगळता घोषित कारण्यात आलेल्या शांतता क्षेत्रांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी तसेच नागरी क्षेत्रातील शांतता क्षेत्रांची माहिती संबंधित महानगरपालिका, नगर पालिकांनी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. पोलीस यंत्रणेने ध्वनी प्रदूषण उल्लंघनाबाबत सामान्य नागरिकांच्या तक्रारी १०० क्रमांकावर नोंदवून घ्याव्यात. निनावी तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात यावी. प्राप्त तक्रारींसाठी एक नोंदवही ठेऊन त्यामध्ये तक्रारींची व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात यावी. ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी  ई-मेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.
             यावेळी बोलतांना महानगरपालिका आयुक्त म्हणाले की, सण साजरे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही व रहदारीस अडथळा निर्माण होणार नाहीत व उच्च न्यायालायाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होण्यासाठी, धुळे महानगरपालिकेच्या वतीने जनभावनांचा मान राखून जनजीवनावर परिणाम होणार नाही अशी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तक्रार निवारण व्यवस्था निर्माण केली असून १८००२३३३०१० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच नागरिक आपल्या तक्रारी धुळे महानगरपालिकेच्या dhule_dme@rediffmail.com   ई-मेल वरही करू शकतील.
             पोलीस प्रशासनाच्या १०९१ या टोल फ्री क्रमांकावर तसेच sp.dhule@mahapolice.gov.in  या ई-मेल वर नागरिक ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भातील तक्रारी नोंदवू शकतील असे यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.
000000


मंगळवार, २१ जुलै, २०१५

विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ शालेय पोषण आहार योजनेची बैठक संपन्न

           धुळे, दि. 21 :- विद्यार्थ्यांची शैक्षणिक उपस्थिती जास्ती-जास्त रहावी यासाठी विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो.  ज्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे.  त्या शाळांवर लक्ष ठेवणे, शालेय समितीच्या वारंवार बैठका घेऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शालेय पोषण आहार योजनेची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले,   गट शिक्षणाधिकारी किशोर पाटील(साक्री), एम. आर. पवार (शिंदखेडा), एस. एन. देवरे (धुळे) एम. आर. कुवर (शिरपूर),  महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे (शिंदखेडा), व्ही. आर. पवार (साक्री) आदी उपस्थित होते. 
         पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, कमीत कमी 20 दिवस पुरेल एवढा धान्यसाठा, पोषण आहार शाळेत उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी.  शाळेत विद्यार्थ्यांची शारीरिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे.  पाण्याची व्यवस्था ज्या शाळेत नसेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
        शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देतांना तो अत्यंत स्वच्छ स्वरूपात दिला जावा जेणे करून विषबाधासारख्या घटना घडणार नाही.  त्यासाठी धान्य, तेल स्वच्छ जागेत ठेवावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
000000


सोमवार, २० जुलै, २०१५

कृषी उत्पन्न बाजार समिती भाडेकराराचे दस्त गाळेधारकांनी मुद्रांकित करून घेण्याचे आवाहन

            धुळे, दि. 20 :- कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळे धारकांनी आपले भाडेकराराचे दस्त मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून सदरचे दस्त यथोचित मुद्रांकित करून घ्यावे, असे आवाहन प्रभारी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी   प्रवीण  वायकोळे  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाडेकरार नोंदणीकृत व योग्य मुद्रांकित नसल्याने शासन महसूल मोठया प्रमाणावर चुकविला जात आहे.  ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी असे दस्त नोंदणीकृत न करता, सदरचे करारनामे, भाडेपट्टे केलेले आहे.  अशा दस्ताच्या छायांकित प्रती मुद्रांक जिल्हाधिकारी, धुळे या कार्यालयात जमा करून त्यास आवश्यक ते मुद्रांक शुल्क व दंड भरून ते नियमित करून घ्यावेत.  याबाबत उच्च न्यायालय, मुंबई यांनी चुकविलेले मुद्रांक शुल्क वसुल करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिलेले आहे.
            कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत त्यांच्या मालकीचे गाळे ठराविक कालावधीकरिता भाडेकरार नाम्याद्वारे वाटप केले जातात.  या करारनाम्यास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार आवश्यक मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निबंधक कार्यालयात करारनाम्याची रितसर नोंदणी करणे आवश्यक आहे.  मात्र अशा प्रकारच्या भाडेकराराची नोंदणी न करता केवळ रूपये 100/- च्या मुद्रांकावर भाडेकरार करण्यात येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत गाळे वाटप करण्यात येतात, असेही पत्रकात नमूद केले आहे. 

0000000