मुंबई दि. 29 :यंदा पावसाळ्यात
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी अंशत: सुरु ठेवण्याचा निर्णय वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
पावसाळ्यात ताडोबा अंधारी व्याघ्र
प्रकल्पात पर्यटन सुरू ठेवावे अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. मागील वर्षी सुध्दा
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये अंशत: उपक्रम चालू होते. त्यामुळे यावर्षी
पावसाळ्यात सदर व्याघ्रप्रकल्पात अंशत:
पर्यटन सुरु ठेवण्यास हरकत नसल्याच्या
शिफारसीसह प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी वनमंत्र्यांकडे
पाठवला होता.त्यानुसार पावसाळयात सदर व्याघ्र प्रकल्पास भेट देणा-या पर्यटकांना अंशत: पर्यटनाचा लाभ घेता यावा यादृष्टीने या प्रस्तावाला वनमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी मान्यता दिली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा