मुंबई
दि. 29: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य
योजनेतून सर्वसामान्य माणसांच्या आरोग्याचे रक्षण होणार असल्याने या योजनेस निधीची
कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आज वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या
योजनेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री
दीपक सावंत, अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन सुनील पोरवाल, वित्त विभागाचे अपरमुख्य
सचिव सुधीर श्रीवास्तव, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या प्रधान सचिव, सुजाता सौनिक यांच्यासह सार्वजनिक आरोग्य संचालनालयाचे
वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या ज्या
योजनांना निधी देण्यात आला आहे तो निधी नमूद कामासाठीच खर्च केला जाईल याची दक्षता
आरोग्य विभागाने घ्यावी अशा सूचना देऊन वित्तमंत्र्यांनी वित्त विभागाच्या
अतिरिक्त मुख्य सचिवांना विधिमंडळात घोषित केलेल्या योजनांचे योग्यप्रकारे
मुल्यमापन करून त्यांना आवश्यक असलेला निधी देण्याबाबतही आदेश दिले.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा