मुंबई, दि. 29 : आंध्रप्रदेश
विधानपरिषदेचे सभापती डॉ. ए. चक्रपाणी आणि बिहार विधानपरिषदेचे सभापती अवधेश
नारायण सिंग यांनी आज महाराष्ट्र विधानमंडळाला भेट दिली. याप्रसंगी महाराष्ट्र
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
विधानमंडळाची आदर्श आचारसंहिता व मार्गदर्शक तत्त्वे याबाबत
श्री. निंबाळकर तसेच श्री. सिंग व श्री. चक्रपाणी यांच्यात चर्चा झाली.विविध राज्यांच्या विधीमंडळांची कार्यप्रणाली, आचारसंहिता या आधारे मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येतील असे श्री. निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी आमदार हेमंत टकले, संजय दत्त, हुस्नबानु खलिफे आदींची
समयोचित भाषणे झाली. प्रारंभी विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी
उपस्थितांचे स्वागत केले तर सचिव यु. के. चव्हाण यांनी आभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा