मुंबई दि.28- माध्यमातील आजच्या
स्पर्धेच्या युगात वर्तमानपत्राचे महत्व अबाधित असूनमागील 65 वर्षापासून नवभारत
टाईम्स या वृत्तपत्राने आपल्या वार्तांकनांने स्वत:ची
एक वेगळी ओळखनिर्माण केली आहे. इतर वृत्तपत्रानीही नवभारत टाईम्स प्रमाणे
सकारात्मक आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारी माहिती छापण्यास प्राधान्य द्यावे
,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले.
नवभारत टाईम्स च्या 65व्या वर्धापण दिनानिमित्त आयोजीत '
नवभारत उत्सव ' या कार्यक्रमात ते बोलत
होते.यावेळी गृहनिर्माण राज्य मंत्री
रविंद्र वायकर, नवभारत टाईम्सचे संपादक सुंदरचंद ठाकूर, ज्येष्ठ अभिनेत्री आशा
पारेख, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री,
अभिनेत्री विद्या बालन, अभिनेत्री जुही चावला,गायक कैलास खेर, आदी मान्यवर
उपस्थितीत होते.
वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले
की, वृत्तपत्र हे केवळ बातम्या देणारे साधन नाही.तर विविधांगी
माहिती पुरवून जनतेशी संवाद साधणारी संस्था आहे.या वेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते
मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा